उद्धव ठाकरेंना धक्का: पालघर 'ZP' वर फडकला भाजप- शिंदे गटाचा भगवा!

Palghar Zilla Parishad पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली..
Palghar Zilla Parishad
Palghar Zilla Parishad
Published on
Updated on

Palghar Politics : पालघर जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. या ठिकाणी शिंदे गट आणि भाजप यांनी युतीची सत्ता स्थापन केली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिंदे गटाचे प्रकाश निकम तर उपाध्यक्षपदी भाजपचे पंकज कोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, निवडणुकीच्या माध्यमातून शिंदे गटाला महाराष्ट्रातला पहिला जिल्हा परिषद अध्यक्ष मिळाला आहे.

पालघर जिल्हा परिषदेत 57 सदस्य असून बहुमतासाठी 29 हा सदस्यांची आवश्यकता असते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिंदे गटाला 20 आणि भाजपला 13 सदस्य निवडूण आले. यानंतर शिंदे गटाने आणि भाजपने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. तर बहुमत नसल्याने महाविकास आघाडीने एकही अर्ज दाखल केला नव्हता. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला 13, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीला 6 आणि बहुजन विकास आघाडीला 5 जागा मिळाल्या. त्यामुळे निवडणूक बिनविरोध पार पडली.

Palghar Zilla Parishad
'या' मागण्या पुर्ण झाल्या नाही तर हजारो शेतकऱ्यांसह तुपकर अरबी समुद्रात जलसमाधी घेणार

पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली. दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान निकाल जाहीर करण्यात आला. या पुर्वी पालघर जिल्हा परिषद महाविकास आघाडीच्या ताब्यात होती. पण आधीच्या शिवसेनेतील सर्वच्या सर्व वीस आमदार शिंदे गटात सामील झाल्यामुळे पालघर जिल्हा परिषदेत ठाकरे गटाचा एकही उमेदवार उरला नाही. त्यामुळे राज्यातील सत्तांतरा प्रमाणे इथेही सत्ता परिवर्तन झालं. पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार रवींद्र फाटक पालघरमध्ये ठाण मांडून होते.

पालघर जिल्हा परिषदेतील ठाकरे गटाचे सदस्य आणि पालघर जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. या निर्णयाचा ठाकरे यांच्या गटाला मोठा फटका बसला. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सदस्यांनीही वसंत चव्हाण यांच्यासह शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे शिंदे गटाचही जिल्ह्यात बळ मिळालं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com