Mumbai News : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याचदरम्यान, मुंबईतून मोठी अपडेट समोर आली आहे. एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्यानंतर आता त्यांच्या पत्नी स्विकृती शर्मा यांची राजकारणात एन्ट्री झाली आहे.
मलबार हिल परिसरात जोरदार शक्तिप्रदर्शन करत स्विकृती शर्मा या आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी निघाल्या होत्या. शर्मा यांच्या रॅलीत 50 गाड्या, 25 बसेस अन् 100 पेक्षा जास्त दुचाकींचा समावेश होता.
ठाण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या(Eknath Shinde) 'नंदनवन' या निवासस्थानी दाखल झाल्या. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा इच्छुक आहेत. त्या मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारीत असल्याचे बोलले जात आहे. पण त्या कोणत्या मतदारसंघातून लढणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माची पत्नी स्विकृती शर्मा या सोमवारी (ता.29) एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. प्रदीप शर्मा यांनी 2019 साली उद्धव ठाकरेंकडून लढवली होती. बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्याविरोधात नालासोपारा मतदारसंघातून शर्मा यांनी निवडणूक लढवली होती. ॲंटिलिया प्रकरणात प्रदीप शर्मांना सुनावण्यात शिक्षा आली होती.
मुंबई पोलीस दलातील कारकीर्द वादग्रस्त ठरल्यानंतर प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांनी राजकारणात एन्ट्री घेतली होती. शर्मा एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांच्या पत्नीचे तिकीट कन्फर्म असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. आता स्विकृती शर्मा यांच्या माध्यमातून मुंबईत शिंदे गट मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेनेमध्ये स्विकृती प्रदीप शर्मा यांचा शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश झालेला आहे. स्विकृती यांनी सगळ्या महिला इकडे आणल्या आहेत. गेल्या 2 वर्षांपासून राज्यात महायुतीच्या सरकारचे काम सुरू आहे. सर्वसामान्यांचे, गोरगरिबांचे, महिला, युवकांचे सरकार म्हणून काम करत आहोत.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना,मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, तीन सिलेंडर आपण मोफत देणार आहोत. कुटुंबातील 2 महिलांना महिलांना 3000 आणि वर्षभरात 36 हजार रुपये मिळणार आहेत. काहींनी म्हटलं की, लाडकी बहीण आणली. लाडक्या भाऊचं काय? आपण लाडक्या भावाला देखील आणलं. स्टायपेंड देणार देशातील आपलं पहिलं राज्य आहे असेही शिंदे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.