Amol Mitkari criticized Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील पूर परिस्थितीवरून राज्य सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुंबई बर्बाद व्हायला वेळ लागला, पण पुणे बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही, हे मी अनेक वर्षांपासून सांगतोय. त्याचचं हे चित्र आहे. असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
तसेच यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या(Ajit Pawar) नावाचा उल्लेख न करता त्यांच्यावरही निशाणा साधला. दोन पैकी एक उपमुख्यमंत्री पुण्याचे आहेत, ते पुण्यात नसतानाही धरणं वाहू लागली आहेत, एवढं पाणी पडलं. असं राज ठाकरेंनी म्हटलं. ज्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार अमोल मिटकरी यांनी पलटवार केला आहे.
अमोल मिटकरी(Amol Mitkari) म्हणाले, 'दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांबद्दल सुपारीबहाद्दरांनी बोलू नये. कारण, हे सुपारीबहाद्दर टोलनाक्याचं आंदोलन असेल, भोंग्याचं आंदोलन असेल आणखी कोणतं आंदोलन असेल ते जीवनात कधीच यशस्वी करू शकले नाहीत. विश्वासहार्ता या व्यक्तीची संपलेली आहे. राजकारणात, महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तीने अजितदादांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं, म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे.'
तसेच, 'सुपारीबहाद्दर लोकांकडून जनतेने योग्य तो धडा घेतलेला आहे. नव्या नवरीचे नऊ दिवस म्हणून कुठंतरी पुण्यात भेट द्यायची. ज्या व्यक्तीला एनडीआरएफचा संपूर्ण लाँगफॉर्म माहीत नाही, तो माणूस आज आपत्ती व्यवस्थापनावर बोलत आहे. म्हणजे मला असं वाटतं अलीकडच्या काळातील राजकारणातील हा सर्वात मोठा जोक आहे.' असंही अमोल मिटकरी यांनी म्हणत राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
'आज जर समजा मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यापैकी एक तर पुण्याचेच आहेत. म्हणजे ते नसताना पण धरण वाहत आहे, एवढं पाणी पडलं. आता मला असं वाटतं की त्यांनी यामध्ये लक्ष घालायला नको का? हे काही जगात पहिलं एकमेव शहर नाही, की ज्याच्या मधून नदी जाते. जगात अशी सगळीच शहरं आहेत, की ज्यामधून नदी जाते. मग ते काय करतात आणि मग आपल्याकडे का नाही होत गोष्टी? इलेक्ट्रिकच्या पोलला दिवे लावायचे हे उद्योग करण्यापेक्षा मला असं वाटतं या विषयांवरती लक्ष घातलं पाहिजे.' असं राज ठाकरे(Raj Thackeray ) म्हणाले होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.