JJ Hospital Case Sarkarnama
मुंबई

JJ Hospital Case: मोठी बातमी! जे.जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे

Dr.Tatyarao Lahane Resignation: डॉ.तात्याराव लहाने यांचा राजीनामा राज्य सरकारने मंजूर केल्यानंतर निवासी डॉक्टरांचा संप मागे

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: मुंबईतील जे.जे.रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप अखेर मागे घेतला आहे. संपात सामील झालेले निवासी डॉक्टर आजपासून कामावर रुजू होणार आहेत.

जे.जे.रुग्णालयातील ज्येष्ठ डॉ.तात्याराव लहाने यांचा राजीनामा शनिवारी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला. त्यानंतर आज निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप मागे घेतला आहे.

जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी डॉ.तात्याराव लहाने यांच्या बदलीसाठी आंदोलन करत संप पुकारला होता. जे.जे रुग्णालयातील काही प्राध्यापक आणि डॉक्टर विद्यार्थ्यांना त्रास देत असल्याचा आरोप निवासी डॉक्टरांनी केला होता.

याबरोबरच डॉ.तात्याराव लहाने यांच्या बदलीची मागणी या निवासी डॉक्टरांनी केली होती. निवासी डॉक्टरांनी केलेल्या या आरोपानंतर डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह नऊ डॉक्टरांनी तडकाफडकी राजीनामे दिले होते.

त्यानंतर शनिवारी राज्य सरकारकडून डॉ.तात्याराव लहाने यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. तसेस निवासी डॉक्टरांनी केलेल्या आरोपांवर डॉ.तात्याराव लहाने यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडत त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले होते.

वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या डॉ.तात्याराव लहाने यांच्यावर निवासी डॉक्टरांनी गंभीर आरोप केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर डॉ.तात्याराव लहाने यांनी तडकाफडकी राजीनामा देत आपली भूमिका मांडली. मात्र, राज्य सराकारने त्यांचा राजीनामा मंजूर केला. त्यानंतर आता निवासी डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT