Phone tapping case News  Sarkarnama
मुंबई

IPS Rashmi Shukla Phone Taping Case : रश्मी शुक्लांना मोठा दिलासा; उच्च न्यायालयाकडून क्लीन चिट

IPS Rashmi Shukla News : राज्य गुप्तचर विभागात कार्यरत असताना रश्मी शुक्ला यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग करण्याचा आरोप झाला होता.

अनुराधा धावडे

Mumbai News : मुंबई उच्च न्यायालयाकडून आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना क्लीन चिट मिळाली आहे. त्यांच्याविरुद्ध दाखल दोन्ही एफआयआर रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यात एक एफआयआर पुणे आणि दुसरी मुंबईच्या कुलाबा पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली. राज्य गुप्तचर विभागात कार्यरत असताना रश्मी शुक्ला यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग करण्याचा आरोप झाला होता.

विरोधी पक्षनेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरणी ठाकरे सरकारच्या काळात एफआयआर दाखल करण्यात आला होता.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या फोन टॅपिंग प्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात, संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या फोन टॅप केल्याप्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी पुणे आणि मुंबईत एफआयआर दाखल करण्यात आला होते. पुण्याच्या प्रकरणात पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दिला होता. तर कुलाबा प्रकरणात राज्य सरकारने खटला चालवण्यास नकार दिला होता. त्यामुळे न्यायालयाने आज दोन्ही एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

2019 मध्ये संजय राऊत-एकनाथ खडसे यांचे फोन टॅपिंग प्रकरण

महाराष्ट्राच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या शिफारसीनुसार, मार्च महिन्यात सशस्त्र सीमा बलच्या संचालकपदावर वरिष्ठ आयपीएस शुक्ला नियुक्ती करण्यात आली आहे. त्याआधी त्या महाराष्ट्र राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या.त्यांच्यावर 2019 मध्ये संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांनी फोन टॅपिंग केल्याचे आरोप होते. या प्रकरणी संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांनी त्यांच्याविरुद्ध स्वतंत्र एफआयआर दाखल केले.

काय आहे प्रकरण?

नाना पटोले, संजय राऊत, एकनाथ खडसे यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदा फोन टॅपिंग केल्याचा गंभीर आरोप होता. याप्रकरणी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती स्थापन नेमण्यात आली. पांडे यांच्या समितीने अहवाल सादर केल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाना पटोले, संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांच्या फोन टॅपिंगप्रकरणी पुणे, मुंबई आणि कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुसरीकडे, या प्रकरणी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचाही जबाब नोंदवण्यात आला होता.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT