New Delhi : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार यांनी पक्ष आणि चिन्हावर केंद्रीय निवडणूक आयोगात दावा दाखल केला आहे. याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. अजित पवार यांच्या गटाचा दावा फेटाळण्यात आला आहे.
अजित पवार यांच्याकडून काही महिन्यांपूर्वी बंडखोरी करण्यात आल्यानंतर त्यांनी थेट पक्षावर आणि चिन्हावर दावा केला होता. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे ही अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे सादर केले होते. त्यानंतर या प्रकरणी आक्रमक झालेल्या शरद पवार गटाकडून या प्रकरणी निवडणूक आयोगात दाद मागण्यात आली होती.
निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला मागील महिन्यात उत्तर देण्यास सांगितले होते. परंतु त्यांनी चार महिन्यांचा वेळ मागण्यात आला होता. निवडणूक आयोगाकडून तीन आठवड्यांचा वेळ देण्यात आला.
आज (8 सप्टेंबर) उत्तर देण्याची वेळ संपणार होती. त्यामुळे शरद पवार गटाकडून अजित पवार यांच्याकडून करण्यात आलेल्या दाव्यावर उत्तर दिले आहे. शिवसेनेसारखीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये देखील आता पक्षाच्या चिन्हावरून आणि नावावरून न्यायालयीन लढाई सुरू होण्याचे चिन्ह आहे.
पहिल्यांदाच अपात्र आमदारांचा आकडा समोर
निवडणूक आयोगाला शरद पवार गटान दिलेल्या उत्तरात पहिल्यांदाच अपात्र आमदारांचा आकडा समोर येत आहे. नऊ मंत्र्यांविरोधात शरद पवार गटाने याचिका दाखल केलेली आहे. नऊ मंत्र्यांशिवाय 31 आमदारांच्या विरोधातही अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आलेली आहे.
वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत निर्णय..
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाल्यानंतर अजित पवार गटाने निवडणूक आयोगात याचिका दाखल केली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी बैठकीत निर्णय घेतल्याचे याचिकेत म्हटले आहे. याबाबतची प्रतिज्ञापत्रही अजित पवार गटाने निवडणूक आयोगाने दाखल केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.