Sharad Pawar and Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

NCP Crisis News : अजित पवारांना मोठा धक्का; निवडणूक आयोगाकडून शरद पवारांची मागणी मान्य ? घड्याळ चिन्ह गोठवणार नाही, तर...

Deepak Kulkarni

Mumbai News : शिवसेनेपाठोपाठ जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसदेखील फुटली होती.या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नाव, चिन्हावरील दावे - प्रतिदाव्यांनंतर आता शरद पवार गट आणि अजित पवार गटात कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील सुनावणीला शुक्रवारी सुरुवात झाली.

या सुनावणीवेळी शरद पवारांच्या गटाने निर्णय होईपर्यंत घड्याळ हे पक्षचिन्ह गोठवण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली होती. आता निवडणूक आयोगाने पवारांची ही मागणी मान्य केली असून, राष्ट्रवादीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आयोगाने राष्ट्रवादीचे घड्याळ हे चिन्ह गोठवणार नसून थेट अंतिम निर्णय देणार असल्याची माहिती समोर येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) पक्षचिन्हाच्या वादावर शुक्रवारी निवडणूक आयोगात सुनावणी झाली. या सुनावणीत पक्षाध्यक्ष शरद पवार हे स्वतः उपस्थित होते.अजित पवार यांच्या बाजूने कोणीही उपस्थित नव्हते. शरद पवारांकडून वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला, तर अजित पवार यांच्याकडून नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंह यांनी युक्तिवाद केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवू नये, अशी मोठी मागणी शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू संघवी यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. (Ajit Pawar)

निवडणूक आयोगाने तात्पुरता निर्णय न देता अंतिमच निर्णय देणार आहे.यात ष्ट्रवादीच्या प्रकरणात निवडणूक चिन्ह गोठवले जाणार नसल्याचेही आयोगाने सांगितले आहे. त्यामुळे कोणत्याही एका गटाला घड्याळ हे चिन्ह आणि नाव मिळणार असून, दुसऱ्या गटाला पक्षासाठी नवीन चिन्ह आणि नवीन नाव शोधावं लागण्याची शक्यता आहे.

शरद पवार गटाचे वकील संघवी काय म्हणाले ?

शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू संघवी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील सुनावणीवेळी युक्तिवाद केला. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस हा मूळ पक्ष आमच्याकडे आहे,पक्षातील केवळ एक गट बाहेर पडला आहे. आमदारांची संख्या जास्त आहे म्हणून फरक पडत नाही.त्यांचा पक्ष ठरू शकत नाही.

काही लोक सोडून गेले असतील आणि ते आमदार असले तरीही मूळ पक्ष आमचा आहे. पक्षाच्या घटनेतील पदे पाहता आमचा दावा योग्य आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवू नये, अशी मोठी मागणी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे वकील संघवी यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती.

राष्ट्रवादीच्या पक्ष चिन्हाच्या वादावर शुक्रवारी निवडणूक आयोगात सुनावणी झाली. या सुनावणीत दोन्ही गटांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला.आता पुढची सुनावणी येत्या सोमवारी दुपारी चार वाजता होणार आहे. त्यामुळे आता सोमवारी होणाऱ्या सुनावणीत काय फैसला होतो, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT