Dombivli News : "...तर तुमची तोंडे रस्त्यावरच्या धूळ, मातीने काळी करणार!"; शिंदे गटाच्या नेत्याने अधिकाऱ्यांना भरला दम

Shivsena Political News : " सत्ता बघणार नाही की आदेश..."
Shivsena Political News
Shivsena Political News Sarkarnama
Published on
Updated on

Dombivali News : कल्याण- डोंबिवलीमधील रस्त्यांची खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची स्थिती सुधारू, असे आश्वासन पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिले होते. मात्र, आता नवरात्रोत्सव तोंडावर आला तरी खड्डे नीट भरले गेले नाहीत. शिवाय त्यातील खडी आणि धुळीने नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी पालिका पदाधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

कल्याण-डोंबिवली शहरातील रस्त्यांची खड्ड्यांनी चाळण झाली आहे. हे खड्डे खडी व मातीचा भराव टाकून भरण्यात आले असून, या खडीचा धुरळा उडून नागरिक आणखी हैराण झाले आहेत. पावसाने उघडीप देऊनही खड्डे भरले जात नसल्याचे समोर आले आहे.

Shivsena Political News
Jayant Patil Reply to Ajit Pawar Group : अजितदादा गटाच्या निवडणूक आयोगातील आक्षेपाला जयंत पाटलांचे तडाखेबंद उत्तर...

शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी पालिका पदाधिकाऱ्यांना खडसावले. ते म्हणाले, सत्ता बघणार नाही की आदेश बघणार नाही. तुम्हाला कामाला लावू, असा सज्जड दमही भरला. तसेच अधिकाऱ्यांवर नुसती कारवाई नाही तर त्यांची तोंडे रस्त्यातील धूळ मातीने काळी करू, असा इशारा देण्यात आला. दोन दिवसांत खड्डे बुजवले नाहीत आणि धूळ साफ नाही केली तर सत्ता बघणार नाही, आदेश बघणार नाही, कामाला लावणार, असेही ते म्हणाले.

या सर्व घटना पाहता शुक्रवारी शिवसेना(Shivsena) शिंदे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी रस्त्यावर उतरत कामाची पाहणी करून पालिका अभियंत्यांची कानउघडणी केली. शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम व संतोष चव्हाण उपस्थित होते, तर पालिकेचे शहर अभियंता अर्जुन अहिरे, मनोज सांगळे यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.

कल्याण-डोंबिवली महापालिका(Kalyan Dombivli Corporation) अभियंते रस्ते डांबरीकरण करणाऱ्या कंत्राटदारांना पाठीशी घालत आहेत का ? शहरातील महत्त्वाचे व वाहतुकीसाठी वर्दळीचे असे रस्ते तातडीने का दुरुस्त झाले नाहीत ? अशी विचारणा मोरे यांनी अधिकाऱ्यांना केली. ठाकुर्ली पूल ते मंजुनाथ व नेहरू रस्ता या रस्त्याची बिकट परिस्थिती त्यांनी अधिकाऱ्यांना दाखवली. तसेच निकृष्ट दर्जाचे काम करणारे कंत्राटदार यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश त्वरित दिले पाहिजेत, असा इशाराही त्यांनी दिला.

दोन दिवसांत वाहतुकीच्या प्रमुख रस्त्यांसह इतर रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम झाले नाही, तर अधिकाऱ्यांवर नुसती कारवाई नाही, तर त्यांची तोंडं रस्त्यातील धूळ मातीने काळी करू, असा इशारा देण्यात आला. तसेच निकृष्ट दर्जाचे काम करणारे कंत्राटदार यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश त्वरित दिसले पाहिजेत, असा सज्जड दमदेखील देण्यात आला आहे.( Latest Political News)

(Edited By Deepak Kulkarni)

Shivsena Political News
NCP Hearing : शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी; ‘राष्ट्रवादीचा निर्णय होईपर्यंत चिन्हे गोठवू नका’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com