Uday Samant and Uddhav Thackeray
Uday Samant and Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Uday Samant : शिंदे गुवाहाटीवरुन परतल्यावर ठाकरे गटाला आणखी खिंडार पडणार ? ; सामंतांचे सूचक विधान

सरकारनामा ब्युरो

Uday Samant : चाळीस आमदारांसह एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी पाच महिन्यापूर्वी शिवसेनेत बंड केलं. गुजरातनंतर एकनाथ शिंदे सर्व बंडखोर आमदारांसह गुवाहाटीला मुक्कामाला होते. येथे कामाख्या देवीच्या दर्शन घेऊन सर्व आमदारांनी मोठं शक्तीप्रदर्शनही केलं. त्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि सत्तांतर झालं. (Uday Samant latest news)

आज (शनिवारी) पुन्हा मुख्यमंत्री शिंदे हे आपल्या आमदारांसह गुवाहाटीला कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी गेले आहेत. गुवाहाटीला जाण्यापूर्वी शिंदे गटाचे नेते, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सूचक विधान केले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

"आम्ही गुवाहटीवरून परत येताना जास्त आमदार घेऊन येऊ," असे सूचक वक्तव्य उदय सामंत केले आहे. त्यामुळे शिंदे गट या दौऱ्यात ठाकरे गटाला आणखी काही धक्का देणार का?, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. शिंदे गट गुवाहाटीवरुन परत आल्यानंतर ठाकरे गटाला आणखी खिंडार पडले की नाही, हे लवकरच समजेल.

गुवाहाटीला जाण्यापूर्वी मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "राज्यावरील अरिष्ट जाऊ दे ही प्रार्थना कामाख्यादेवीकडे करणार आहोत. राज्यासाठीच आम्ही हे करत आहोत, आम्ही राज्यातील बळीराजाला सुखी होऊ दे, जनतेच्या जीवनात अमूलाग्र बदल होऊ दे,अशी प्रार्थना करणार आहोत,"

"गुवाहाटीवरून गेल्यावेळी आम्ही गडबडीत आलो होतो. त्यामुळे आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला पुन्हा येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार आता श्रद्धेने जात आहोत. आमचे सर्व आमदार उत्साहात आहेत. राज्यातील बळीराजाला सुखी होऊ दे, जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल होऊ दे, राज्यावरील अरिष्ट जाऊ दे ही प्रार्थना करणार आहे. ही प्रामाणिक भावना आहे. हाच आमचा अजेंडा आहे. बाकी काही दुसरा आमचा अजेंडा नाही," असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT