Eknath Shinde : कामाख्या देवीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्र्यांच्या विमानाचे टेक ऑफ ; सहा आमदारांची दांडी

Eknath Shinde : या दौऱ्यात कामाख्या देवीचे दर्शन आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांची भेट असे दोन मुख्य कार्यक्रम असणार आहेत.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिंदे गटातील सर्व मंत्री आणि आमदारांना घेऊन गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहेत, दहा वाजता त्यांच्या विमानाने गुवाहाटीच्या दिशेने टेक ऑफ केले. या दौऱ्याची गेल्या काही दिवसापासून चर्चा आहे. (Eknath Shinde latest news)

आज (शनिवारी) सकाळी गुवाहाटीला जाण्यासाठी शिंदे व त्यांचे सर्व आमदार कुटुंबियांसमेवत मुंबई विमानतळावर दाखल झाले होते. पण यात दोन आमदार आणि तीन मंत्री अनुपस्थित होते, यामुळे ते नाराज आहेत का ? अशी चर्चा रंगली आहे. या दौऱ्यासाठी १८० तिकीटाचे बुकिंग करण्यात आले आहे.

आपल्या नियोजित कार्यक्रमांमुळे हे सहा आमदार मुख्यमंत्री शिंदेंसोबत कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाऊ शकले नाही, अशी माहिती समोर येत आहेत. पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, आरोग्यमंत्री तानाजी सांवत, आमदार संजय गायकवाड,आमदार चंद्रकात पाटील, महेंद्र दळवी याचा मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात सहभाग नाही.

मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे हे देवदर्शन करण्यात मग्न असल्याची टीका विरोधक करीत असताना पुन्हा एकदा ते कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहेत. दोन दिवसापूर्वी शिंदेंनी शिर्डीला जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले आहे.

Eknath Shinde
Rupali Chakankar : महिलांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या बाबा रामदेव यांना महिला आयोगाचा दणका

या दौऱ्यात कामाख्या देवीचे दर्शन आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांची भेट असे दोन मुख्य कार्यक्रम असणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी गुवाहाटी विमानतळावर स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहे. त्याचसोबत काही महिन्यांपूर्वीच या दौऱ्याची तयार करण्यात आली होती.

ज्योतिषाला हात दाखविल्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंवर टीका होत होती. अशातच आता पुन्हा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह शिंदे गटातील सर्व मंत्री आणि आमदार गुवाहाटीला जाण्यावरून त्यांचा हा दौरा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे दिसत आहेत.

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दे कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहेत, त्यांना शुभेच्छा. कामाख्या देवीला रेड्याचा बळी दिला जातो, शिंदे गट आता कुणाचा बळी द्यायचा गुवाहाटीला जात आहेत, हे माहित नाही," अशा शब्दात काल (शुक्रवारी) विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खिल्ली उडवली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com