Chandrakant Patil News  Sarkarnama
मुंबई

Chandrakant Patil on Babri: बाळासाहेबांनी चार सरदार पाठवले होते का? बाबरी पाडायला एकही शिवसैनिक नव्हता; चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान

Chandrakant Patil News : चंद्रकांत पाटलांच्या या दाव्यामुळे पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता

सरकारनामा ब्यूरो

Politics: राज्यात सध्या भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे गटामध्ये आरोप आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू आहे. असे असतानाच आता भाजप नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशीद पाडण्यात शिवसेनेचा काहीही संबंध नव्हता, असा दावा केला आहे.

चंद्रकांत पाटलांनी एका वृत्तवाहीनीच्या मुलाखतीत बोलताना हा दावा केल्यामुळे आता या मुद्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ''बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा सहभाग नव्हता. बाबरी मशीद पाडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, बाबरी मशीद पाडली याची जबाबदारी मी घेतो. पण त्यावेळी अयोध्येत शिवसेना गेली होती का? की बाळासाहेब ठाकरे हे तेथे गेले होते?'', असे प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केले.

''बाबरी मशीद पाडण्यात आली, त्यावेळी शिवसेना तिथे गेली होती की बजरंग दल तेथे होतं? मग कारसेवक कोण होते? पण आता एवढं जनरलाईज करण्याची गरज नाही. कारण कारसेवक हे हिंदू होते. कारसेवक हे बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली गेले होते. असं काही नव्हत की आम्ही बजरंग दलाचे नाही आणि शिवसेनेचे नाही, असं त्यांचं नव्हतं. कारण सगळ्यांनी नेतृत्व मान्य केलं होतं की, हे आपण करू शकतो आणि त्यांनी ते केलं'', असं पाटील म्हणाले.

''बाबरी मशीद पाडण्यात आली त्यावेळी आपण स्वत: व्यवस्थापना संदर्भातील कामासाठी अयोध्येत उपस्थित होतो'', असंही त्यांनी सांगितलं. पाटील म्हणाले, ''बाबरी मशीद ज्या वेळी पाडली ते शिवसैनिक नव्हतेच. कारण मला एक महिनाभर तेथे नेऊन ठेवलं होतं.

यामध्ये बिहारचे सुशील कुमार मोदी, हरेंद्र कुमार आणि मी, अशा आम्हा तिघांना तिथं कॉम्बिनेशनसाठी ठेवलं होतं. त्यावेळी आम्हाला सांगितलं होतं की, शेवटचा माणूस बाहेर पडे पर्यंत तुम्ही बाहेर पडायच नाही. काहीही होओ ढाचा पडो न पडो. पण सगळ्यात शेवटी तुम्ही तिघांनी बाहेर पडायचं'', असं सांगितलं होतं.

''मग ज्यावेळी आम्ही बाहेर पडलो, त्या वेळी अयोध्येच्या रस्त्यावर कुणीही नव्हतं. मग आम्ही अशा वातावरणात काम केलेलं आहे. मग बाळासाहेब म्हणाले की मी जबाबदारी घेतो. पण तुम्ही काय चार सरदार तेथे पाठवले होते का?'', असंही पाटील म्हणाले.

(Edited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT