Khaire Visit Affected Farm : पिकं गेली, घरं पडली, जनावरे दगावली; शेतकऱ्यांचा किती अंत पाहणार ?

Kannad : अनेकांचे गोठे उडाले, कांदाचाळीत पाणी गेले, आता तरी सरकारने जागे होऊन मदत करावी.
Khaire Visit Affected Farm News
Khaire Visit Affected Farm NewsSarkarnama

Marathwada : पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे हैराण झालेला बळीराजा आता गारपीट आणि अवकाळीने संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. आता शेतकऱ्यांना (Affected Farmars) मदत नाही केली तर तो कुठलं पाऊल उचलेल हे सांगता येत नाही, त्यामुळे सरकारने गांभीर्याने घ्यावे. पिके गेली, घरे पडली, मुकी जनावरे दगावली, सरकार शेतकऱ्यांचा आणखी किती अंत पाहणार ? असा सवाल ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी सरकारला केला.

Khaire Visit Affected Farm News
Jayant Patil Reaction On Ayodhya Visit: देवाच्या दर्शनासाठी संपूर्ण सरकार जातं हा प्रकार पहिल्यांदाच दिसतोय..

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्या, अशी मागणीही (Chandrakant Khaire) खैरेंनी यावेळी केली. कन्नड तालुक्यातील जेहुर, औराळा, चापानेर भागातील गावांत झालेल्याअवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. (Kannad) रब्बी आणि खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पूर्वीचे कर्ज फेडण्यासाठी पुन्हा काढलेले कर्ज फेडावं कसं ? मायबाप सरकार मदत करणार का ? ही चिंता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आहे.

कांदा, गहु ,उन्हाळी मका, बाजरी, फळबागा, भाजीपाला, द्राक्षे, आंबे, बीजवाई कांदा जमीनदोस्त झाले आहे. मुकी जनावरे देखील मोठ्या प्रमाणात दगावली. पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीची नुकसानभरपाई अद्याप मिळालेली नाही. त्यात आता पुन्हा प्रशासन आणि अधिकाऱ्यांकडे कागदपत्र घेऊन चकरा माराव्या लागणार आहेत, असे खैरे म्हणाले.

मुंगसापूर येथील शेतकरी शिवाजी दाभाडे, जनार्दन दाभाडे यांचा संसार उघडा पडला. घरावरची पत्र उडाली, संसारउपयोगी साहित्याचे नुकसान झाले. अनेकांचे गोठे उडाले, कांदाचाळीत पाणी गेले, आता तरी सरकारने जागे होऊन मदत करावी, असे आवाहन खैरे यांनी केले. मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने बळीराजा संकटात सापडला होता. ती जखम ताजी असतांना गारपिटीने होत्याचे नव्हते केले.

अनेकांना आता रडण्याशिवाय पर्याय राहिला नाही. रात्र रात्र बळीराजा झोपला नाही, प्रशासन आणि सरकारने आता तरी शेतकऱ्यांना न्याय द्यावा, त्यांचे अश्रू पुसावेत अशी मागणी आमदार उदयसिंग राजपूत यांनी केली. ९ एप्रिल रोजी झालेल्या नुकसानीची पाहणी करून तातडीने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे यांची भेट घेऊन राजपूत यांनी त्यांना निवेदन दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com