Jogendra Kawade.,Eknath Shinde, Uddhav Thackeray  Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : ठाकरेंपाठोपाठ शिंदेंकडूनही शिवशक्ती - भीमशक्तीचा प्रयोग? नेमकं काय घडलं?

Jogendra Kawade : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जोगेंद्र कवाडेंचं युतीबाबत मोठं पाऊल!

सरकारनामा ब्यूरो

Eknath Shinde and Jogendra Kawade News: राज्यात भीमशक्ती शिवशक्तीचा प्रयोग पुन्हा अस्तित्वात येण्याच्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरु आहेत. वंचित आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात युती होण्याची शक्यता आहे. या युतीद्वारे ठाकरेंकडून भाजप शिंदे गटाला आव्हान देण्याचा प्रयत्न आहे. मात्र,याचवेळी पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे (Jogendra Kawade) यांनी शनिवारी (दि.31) रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची त्यांच्या ठाण्यामधील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये युतीबाबत दीर्घ चर्चा झाली. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युतीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

यानंतर माध्यमांशी संवाद साधताना जोगेंद्र कवाडे म्हणाले, बाळासाहेबांची शिवसेना या पक्षासोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. आमचा अजेंडा व आमच्या पक्षाची भूमिकाही एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) सांगितली. त्यावर साधकबाधक चर्चा झाली. त्याला शिंदे यांनी चांगला प्रतिसाद दिला. युतीची घोषणा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घोषणा केली आहे. या चर्चेनुसार आगामी निवडणुकीतील शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्रं लढणार आहे.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कवाडे गट,दलित पँथर इतर आंबेडकरी चळवळींना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच कवाडे यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत युती करण्याचे संकेत दिले होते. राज्यातील राजकारण अत्यंत निसरडे असून पीपल्स रिपब्लिकन पार्टी हा पक्ष स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवणार असल्याचे ते म्हणाले होते. ज्या काँग्रेससोबत आम्ही आघाडी केली त्यांनी दगाबाजी केल्याचा आरोप कवाडे यांनी केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT