Mahavikas Aaghadi: राज्यात पुन्हा महाविकास आघाडी सरकार? राष्ट्रवादीच्या आमदाराने दिले मोठे संकेत

Mahavikas Aaghadi: ...त्यावेळेपर्यंत महाराष्ट्रात सत्तांतर झालेलं दिसेल.
Mahavikas Aghadi
Mahavikas AghadiSarkarnama
Published on
Updated on

Amol Mitkari : राज्यात जून महिन्यात मोठा राजकीय भूकंप होऊन महाविकास आघाडी सरकार कोसळलं होतं. यानंतर राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले. आता विरोधकांकडून हे सरकार लवकरच कोसऴणार असल्याचे दावे देखील करण्यात येत आहेत. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी शिंदे फडणवीस सरकारची डेडलाईन सांगितली असून राज्यातील सत्तांतराचे संकेत दिले आहेत.

Mahavikas Aghadi
BREAKING : इगतपुरीला जिंदाल कंपनीत भीषण स्फोट व आग

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचा आमदार अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तो बोलत होते.मिटकरी म्हणाले, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजप व शिंदे गटातील मंत्री व आमदारांनी महापुरुषांविषयी आक्षेपार्ह विधानं केली होती. या वक्तव्यांविरोधात हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षानं सत्ताधारी मंडळींना धारेवर धरलं होतं. या अधिवेशनात विरोधी पक्ष अवमानप्रकरणी कुठेही कमी पडला नाही.

पण,याप्रकरणी सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटानं कोणतीही भूमिका घेतली नाही अशी टीका करतानाच अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राज्यात सत्तांतर होईल असं मोठं विधान देखील मिटकरी यांनी केलं आहे.

Mahavikas Aghadi
Shinde Group News : शिंदे गटातील धूसफूस वाढली : सत्तारांनी माझ्याशी बोलायला हवे होते; वरिष्ठ मंत्र्याने सुनावले

तसेच सभागृहात महापुरुषांच्या अवमानप्रकरणी राज्यपालांविरोधात महापुरुषांच्या अवमानप्रकरणी विधेयक सभागृहात मांडा अशी विनंती देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली होती. तेव्हा फडणवीसांनी विषय दुसरीकडं नेला. एकप्रकारे भाजपा आणि शिंदे गटानं राज्यपालांची पाठराखण केली आहे. महाराष्ट्राची जनता यांना माफ करणार नाही. २७ फेब्रुवारीपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्यावेळेपर्यंत महाराष्ट्रात सत्तांतर झालेलं दिसेल असेही मिटकरींनी सांगितलं आहे.

...वो अण्णा हजारे कहाँ गये!

अमोल मिटकरी यांनी यावेळी अण्णा हजारेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मिटकरी यावेळी बोलताना म्हणाले, महापुरुषांचा अपमान होत असताना सामाजिक कार्यकर्ते अन्ना हजारेंनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, असे मिटकरींना विचारण्यात आलं. यावर मिटकरी म्हणाले, अण्णा हजारेंची प्रकृती ठीक नाही आहे. पण, भाजपाच्या सोयीची भूमिका घेताना अण्णा हजारे बोलतात. भाजपा अडचणीत येईल अशा स्थितीत हजारे बोलत नाही. त्यामुळे त्यांच्यावर शंका येते असंही मिटकरी यांनी यावेळी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com