Dia Mirza Controversy Sarkarnama
मुंबई

Dia Mirza BJP Controversy : दिया मिर्झांचा हिंदुत्वविरोधी अजेंडा? भाजपच्या महापौरांचा गंभीर आरोप; दिवाळी अभियानातील व्हिडिओही हटवला!

BJP leaders Ameet Satam and Ritu Tawde criticise Dia Mirza over her participation in Mumbai BMC's pollution-free Diwali campaign. Her video is removed : अमित साटम यांच्या आक्षेपानंतर महापालिकेची कारवाई; महापौर रितू तावडेंनीही दिया मिर्झांच्या जुन्या भूमिकांचा दाखला देत हिंदुत्वावरून डिवचले.

Pradeep Pendhare

Mumbai BMC Diwali Campaign : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, मुंबई महापालिकेने 'प्रदूषणमुक्त दिवाळी अभियान' सुरू केले आहे. दिवाळीत होणारे वायू आणि ध्वनिप्रदूषण रोखून नागरिकांनी पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करावा, यासाठी या अभियानाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.

अभिनेत्री दिया मिर्झा यांच्यासह माधुरी दीक्षित, अभिनेत्री निशिगंधा वाड आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तीही या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. मात्र, दिया मिर्झा यांच्या सहभागावरून भाजपने तीव्र आक्षेप घेतल्याने या अभियानाला आता राजकीय वळण मिळाले आहे.

मुंबई भाजपचे (BJP) अध्यक्ष तथा आमदार अमित साटम यांनी सर्वप्रथम दिया मिर्झा यांच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 'आम्हाला दिवाळी कशी साजरी करावी, याचे धडे दिया मिर्झा यांच्याकडून घेण्याची गरज नाही. आमच्या परंपरा आणि संस्कृती आमच्या मनात खोलवर रुजलेल्या आहेत,' अशा आशयाची पोस्ट त्यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली.

अमित साटम यांच्या आक्षेपानंतर मुंबई महापालिकेने (BMC) आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून दिया मिर्झा यांचा अभियानातील व्हिडिओ हटवला. विशेष म्हणजे, या मोहिमेत सहभागी असलेल्या अन्य सेलिब्रिटींचे व्हिडिओ मात्र अद्याप कायम आहेत. दरम्यान, या अभियानात सहभागी होण्यासाठी आपण कोणतेही मानधन स्वीकारलेले नाही, असे स्पष्टीकरण दिया मिर्झा यांनी स्वतः दिले आहे.

पीएम मोदींच्या विधानांना विरोधाचा संदर्भ

अमित साटम यांच्यानंतर मुंबईच्या भाजपच्या महापौर रितू तावडे यांनीही दिया मिर्झा यांच्या सहभागावर तीव्र आक्षेप नोंदवला. दिया मिर्झा यांच्या पूर्वीच्या भूमिकांचा संदर्भ देत त्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. "दिया मिर्झा यांची संपूर्ण प्रोफाइल पाहिली, तर त्यांनी नर्मदा प्रकल्प आणि समान नागरी कायद्याला (UCC) विरोध केला होता. पर्यावरणीय संकटावर मात करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांनाही त्यांनी विरोध केला आहे. विशेष म्हणजे, याच क्षेत्रात आम्ही स्वतः काम करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विधानांनाही त्यांनी विरोध दर्शवला आहे. त्यांचा विरोध सातत्याने हिंदुत्वाच्या विरोधात असल्याचे दिसून येते," असे रितू तावडे म्हणाल्या.

दिया मिर्झाची भूमिका हिंदू विरोधी

पुढे बोलताना त्यांनी दिया मिर्झा यांच्या अभियानातील सहभागावर आक्षेप कायम ठेवला. "हिंदूंनी दिवाळी कशी साजरी करावी, हे शिकवण्यासाठी आम्हाला दिया मिर्झा यांची अजिबात गरज नाही. आम्हाला आमची दिवाळी कशी साजरी करायची, हे चांगलेच माहीत आहे. तुम्ही तुमच्या निवडक अजेंड्यावर लक्ष केंद्रित करा. तुमचा विरोध हिंदुत्वाला असल्याचे संपूर्ण चित्र स्पष्ट आहे. त्यामुळेच आम्ही त्यांच्या व्हिडिओला जोरदार विरोध केला. हिंदूंनी दिवाळी कशी साजरी करावी, याचे धडे देण्याची आम्हाला त्यांच्याकडून आवश्यकता नाही," असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT