

INDIA Alliance Ramlila Maidan Rally : इंडिया आघाडीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात दिल्लीतील रामलीला मैदानावरी रॅलीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, चीनची लाल व्यवस्था देशात आणण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा घणाघात केला असतानाच, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील निशाणा साधला.
निवडणूक आयोगाच्या कडक नियमांच्या प्रक्रियेचे कौतुक करत, इंडिया आघाडी यात अडथळे निर्माण करत असल्याचा टोला अमृता फडणवीस यांनी लगावला.
अमृता फडणवीस पुणे येथील एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना, दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीने राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चावर निशाणा साधला.
अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) म्हणाल्या, "निवडणूक आयोगाची मतदार प्रक्रिया नियमांनुसार खूपच प्रामाणिक आहे. या प्रक्रियेत इंडिया आघाडी अडथळे निर्माण करत आहे. त्यांना कोणताच मुद्दा मिळत नाही. त्यातूनच हे अडथळे निर्माण केले जात आहेत. विरोधकांनी मुद्यावरच काम केले पाहिजे, ते देशाच्या हितासाठी ठरेल."
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना महायुती सरकारकडून दिवाळीपूर्व पाच हजार रुपयांची अग्रीम मदत दिली जात आहे. यावर बोलताना, शेतकऱ्यांना पाच हजारांची अग्रीम मदत देण्यास सुरवात झाली आहे. दिवाळीपूर्वी या अग्रीम मदतीचे काम मोठ्याप्रमाणात पूर्ण झालेले असेल, असेही फडणवीस म्हणाल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, इंडिया आघाडीच्या दिल्लीतील मोर्चावर टीका करताना, संविधानिक संस्थांना बदनाम करायच्या, त्यानंतर संविधान आणि लोकशाही नागरिकांना न्याय देऊ शकत नाही, असे जनतेसमोर आरडाओरडा करायचा. यांना चीनची लाल व्यवस्था भारतात आणायची आहे, असे षडयंत्र रचले आहे, अशी टीका केली.
चीनने नेहमीच भारताला पाण्यात पाहिले. त्याच चीनकडून काँग्रेस पक्षाला आणि ट्रस्टला देणग्या का मिळत आहेत. चीनच्या पैशावर भारतात अराजक निर्माण करण्याचा डाव आहे, असेही टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी इंडिया आघाडीच्या मोर्चावर केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.