Devendra Fadnavis, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : शिवसेनेच्या ‘एवढ्या’ जागांवर उमेदवार देऊन भाजपनं CM शिंदेंना सूचक इशारा दिला?

Mahayuti seat-sharing : महायुतीत जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. त्यावरून महायुतीत तणाव असल्याचं बोललं जातं. मात्र, महायुतीत भाजपकडून शिंदे गटावर कुरघोडी करण्याचे प्रयत्न चालू असल्याचं समोर आलं आहे.

Akshay Sabale

Mumbai News: 2019 मध्ये युतीत असताना शिवसेनेनं लढविलेल्या जागांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावा केला आहे. भाजपची पहिली यादी रविवारी जाहीर झाली. यात शिवसेनेनं दावा केलेल्या पाच ठिकाणी भाजपनं उमेदवार जाहीर केले आहेत. यामाध्यमातून भाजपनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सूचक इशारा दिल्याचं बोललं जात आहे.

महायुतीत जागांचा तिढा अद्याप कायम आहे. 2019 मध्ये शिवसेनेनं लढलेल्या जागा पुन्हा मिळाव्यात, यासाठी मुख्यमंत्री शिंदे आशावादी आहेत. मात्र, भाजपनं 99 जणांची पहिली यादी रविवारी जाहीर केली. त्यात शिवसेनेनं दावा केलेल्या धुळे शहर, उरण, अचलपूर, देवळी, नालासोपारा अशा जागांवर भाजपनं उमेदवार जाहीर केले आहेत. हा एकप्रकारे मुख्यमंत्री शिंदेंसाठी सूचका इशारा मानला जातो.

2019 मध्ये शिवसेना पाचपैकी दोन ठिकाणी दुसऱ्या स्थानी, दोन ठिकाणी तिसऱ्या आणि एका जागेवर चौथ्या स्थानी राहिली आहे.   

धुळे शहर

2019 मध्ये शिवसेनेनं येथून हिलाल लाला माळी यांना संधी दिली होती. मात्र, ‘एमएमआय’नं ही जागा ओढून नेली. यंदा भाजपनं येथून अनुप अग्रवाल यांना संधी दिली आहे.

देवळी

शिवसेनेचे समीर देशमुख आणि काँग्रेसचे रणजित कांबळे यांच्यात 2019 मध्ये फाइट झाली होती. मात्र, कांबळे यांनी देशमुख यांचा पराभव केला होता. देशमुख हे तिसऱ्या स्थानी होते. मात्र, 2019 मध्ये दुसऱ्या स्थानी राहिलेल्या राजेश बकाने यांना यंदा भाजपनं उमेदवारी जाहीर केली आहे.

अचलपूर

येथून शिवसेनेच्या सुनीला फस्के विरुद्ध बच्चू कडू यांच्यात लढत झाली होती. मात्र, फस्के तिसऱ्या स्थानी राहिल्या. भाजपनं यंदा प्रविण तायडे यांना उमेदवारी दिली आहे.

नालासोपारा

2019 मध्ये नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडी विरुद्ध शिवसेना, असा सामना झाला होता. यात बहुजन विकास आघाडीच्या क्षितिज ठाकूर यांनी शिवसेनेच्या प्रदीप शर्मा यांचा पराभव केलेला. यंदा मात्र, भाजपनं राजन नाईक यांना संधी दिली आहे.

उरण

उरणमधून गेल्यावेळी शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी करून महेश बालादी यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. बालादी यांनी मनोहर भोईर यांना पराभूत केलं होतं. पण, यंदा भाजपनं महेश बालादी यांना उमेदवारी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT