Sharad Pawar, BJP Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar : 'त्यांचं' आयुष्य दुसऱ्याचं घर फोडण्यात गेलं; रायगडावरून तुतारी फुंकताच पवारांवर भाजपचं टीकास्त्र

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : उपमुख्यमंत्री अजित पवारांना मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह मिळाले. त्यानंतर निवडणूक आयोगाने ज्येष्ठ नेते शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नाव देत तुतारी हे चिन्ह दिले आहे. या तुतारी चिन्हाचे शरद पवारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर अनावरण केले. रायगडावरून आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकताच पवारांवर भाजपने बोचरी टीका केली आहे. (Sharad Pawar)

भाजपने आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट करून शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधला आहे. आता निवडणुका जवळ आल्याने आणि बहुतांश सहकारी अजितदादांसोबत गेल्याने शरद पवारांना रायगडाची (Raigad) आठवण झाली. त्यांना ४० वर्षांत कधीही रायगडाची आठवण झाली नाही. सहानुभूती निर्माण करून मते मिळवण्यासाठी या वयात पवारांना असे उद्योग करावे लागत आहेत. आजपर्यंत त्यांचे आयुष्य दुसऱ्यांचे घर फोडण्यात गेले आहे. त्यामुळे आजपर्यंत शरद पवारांना रायगडावर यायला वेळ नव्हता, असा घणाघात भाजपच्या (BJP) वतीने केला आहे.

क्रेडिट अजितदादांनाच

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही रायगडावर गेलेल्या शरद पवारांना लक्ष्य केले. राजकीय जीवनात असतानाही शरद पवार ४० वर्षांत रायगडावर गेले नाहीत. आज आपल्या तुतारी या चिन्हासाठी पवार रायगडावर गेले. याचे खरे क्रेडिट अजितदादांनाच (Ajit Pawar) द्यावे लागले, असा खोचक टोला फडणवीसांनी पवारांना लगावला. त्यामुळे राष्ट्रवादी एसपी फडणवीसांना कसे उत्तर देणार, याकडे लक्ष आहे.

रायगडावर पवार काय म्हणाले?

देशात महागाई वाढली आहे. बेरोजगारी वाढली आहे, अशी भाजपवर टीका करत पवारांनी इतिहासाचा दाखला दिला. तसेच सामान्य लोकांचे राज्य आणण्यासाठीच तुतारी फुंकणार असल्याचे स्पष्ट केले.

ते म्हणाले, महाराष्ट्राची स्थिती बदलून जनतेचे राज्य आणावे लागणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार ही संघटना मजबूत करायची आहे. निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह दिले असून, ही तुतारी संघर्षाची सुरुवात करण्याची प्रेरणा देणारी आहे. तुमच्या कष्टातून, शौर्यातून, त्यागातून यश मिळेल, असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला.

(Edited by Sunil Dhumal)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT