Ajit Pawar : पक्षफुटीनंतर आरोप-प्रत्यारोप, आता सुप्रिया सुळे अन् रोहित पवारांनी घेतली अजित पवारांची भेट; कारण काय?

Pune News : पुण्यातील सर्किट हाऊस येथे सकाळी तीनही नेत्यांनी अजित पवारांची भेट घेतली.
rohit pawar ajit pawar supriya sule
rohit pawar ajit pawar supriya sulesarkarnama
Published on
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरदचंद्र पवार ) खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि आमदार राजेश टोपे यांनी शनिवारी ( 24 फेब्रुवारी ) उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांची भेट घेतली आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपानंतर पुण्यातील सर्किट हाऊस येथे सकाळी तीनही नेत्यांनी अजित पवारांची भेट घेतली. यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. ( Ajit Pawar Latest News )

rohit pawar ajit pawar supriya sule
Lok Sabha Election 2024 : शिवसेना शिंदे गटाला भाजपचा ठेंगा? उत्तर महाराष्ट्रातील सर्व जागांवर दावा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सर्किट हाऊस येथे विविध कामांसदर्भात बैठकीचं आयोजन केलं होतं. यासह कालवा समितीची बैठकही अजित पवारांच्या नेतृत्वाखाली झाली. या वेळी आमदार रोहित पवार अचानक तेथे आल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या. पण, मतदारसंघातील कामांच्या निमित्तानं रोहित पवार बैठकीला उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार राजेश टोपे यांनीही अजित पवार यांची सर्किट हाऊस येथे भेट घेतली. याबद्दल प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "पिण्याचं पाणी, शेतीसाठी पाणी, गुरांना पाणी तसेच उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात येणाऱ्या चारा छावण्या याचा विचार सत्ताधारी पक्ष म्हणून गांभीर्याने करण्यात यावा, अशी विनंती करण्यासाठी आले होते."

rohit pawar ajit pawar supriya sule
Sharad Pawar : शरद पवारांनी रायगडावरून फुंकली 'तुतारी', म्हणाले, "महाराष्ट्राची स्थिती बदलून..."

"अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्रीदेखील आहेत. ते वेगळ्या विचाराच्या सरकारमध्ये काम करत असले, तरी मतदारसंघातील नागरिकांच्या कामासाठी लोकप्रतिनिधी म्हणून भेट घेण्यात काही वावगं नाही," असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं.

R

rohit pawar ajit pawar supriya sule
Amol Mitkari : आव्हाडांना देण्यासाठी 1 लाखाच्या चेकवर मिटकरींनी केली सही; पण घातली 'ही' अट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com