Uddhav Thackeray,Chandrkant Patil
Uddhav Thackeray,Chandrkant Patil sarkarnama
मुंबई

दोन वर्षात एकदाही मंत्रालयात आले नाहीत, तरीही ठाकरे टॉपच्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : देशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या टॉपच्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नावाचा समावेश झाला आहे. इंडिया टुडे माध्यम समुहातर्फे एक सर्वेक्षण करण्यात आलं असून या सर्वेक्षणात उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता कायम असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उठवली आहे.

''कोणत्या निकषावर ते पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये आले ? कारण गेली सव्वा दोन वर्ष ते एकदाही मंत्रालयात आले नाहीत. ते लोकांसाठी गेल्या 80-90 दिवसांपासून उपलब्ध नाहीत,'' अशा शब्दात पाटलांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

‘मूड ऑफ द नेशन’ या आधारवर ‘इंडिया टुडे’ आणि ‘सी व्होटर’ने एक सर्व्हे केला आहे. सर्व्हेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देशातील टॉपच्या मुख्यमंत्र्यांमध्ये पाचवे स्थान मिळालं आहे.दरम्यान हा सर्व्हे जाहीर झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ''पंतप्रधानांनी बोलावलेल्या कोरोनाच्या आढावा बैठकीला मुख्यमंत्री आजारपणाच कारण सांगून उपस्थित नसतात आणि महापालिकेच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात. कारण त्यांचा महाराष्ट्र म्हणजे फक्त आणि फक्त मुंबई आहे. मग मुंबईबाहेर त्यांना महाराष्ट्र माहीत नाही अशा वेळी त्यांना पाचवा क्रमांक कसा मिळतो,''

इंडिया टुडे माध्यम समुहातर्फे प्रत्येक राज्यातील नागरिकांना त्यांच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानंतर 43 टक्क्यांहून अधिक मतं मिळालेल्या नऊ मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली.

या यादीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौथ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. सर्वोत्तम कामगिरी करण्याऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर ओदिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी स्थान मिळवलं आहे. पटनायक यांनी केलेली कामगिरी 71.1 टक्के नागरिकांना समाधानकारक वाटली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT