मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. ते माध्यमांशी बोलत होते."अजित पवार यांना स्वप्न पडायला लागले आहेत, आता ते कधीच सत्तेत येणार नाहीत, अडीच वर्ष महाराष्ट्रामध्ये मोगलशाही आणि एकतर्फी सरकार चालवलं, अडीच वर्षात महाराष्ट्रातल्या सर्वांगीण विकासाला खिळ बसली, त्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी सत्तेमधील येण्याची स्वप्ने बघू नये," असे बावनकुळे म्हणाले.
अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फलावर घेतल्याचे माण-खटावमध्ये नुकतेच पाहायला मिळाले. 'आमच्याकडे सर्व संस्था होत्या. मात्र, आम्ही सत्तेचा माज केला नाही. आज जे सुरू ते सर्व गलिच्छ राजकारण सुरू आहे. अधिकाऱ्यांनो कुणाचाही दबावात कुणाला त्रास देऊ नका, आम्ही कधी सत्तेत येऊ कळणार नाही, असा गर्भित इशारा पवारांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. यावर बावनकुळे यांनी अजित पवारांना सुनावलं आहे. सातारा जिल्ह्यातील मार्डीमध्ये माजी आमदार स्वार्गीय सदाशिवराव पोळ यांच्या स्मरणार्थ आयोजित शेतकरी मेळाव्या प्रसंगी अजित पवार बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आहे. यावरुन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांची खिल्ली उडवली होती. त्याला बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, "नाना पटोले यांना देवेंद्र फडणवीस यांच्या क्षमतेबद्दल माहिती नाही, फडणवीस यांचे काही प्रायव्हेट व्यवसाय नाही, ते पूर्ण वेळ 18 तास जनसेवेसाठी देतात, त्यामुळे ते सहा नाही तर आठ जिल्हे सांभाळू शकतात, त्यांच्या बाबत नाना पटोले यांनी बोलावे हे सूर्यासमोर दिवा दाखवण्यासारखे आहे. 'नाना पटोले गोंधळलेले आहे, त्यांचा बॅलन्स सुटला आहे, त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही त्यामुळे ते असे वक्तव्य करतात,"
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, यावर बावनकुळे म्हणाले, "मुख्यमंत्र्यांच्या धमकीसंदर्भामध्ये सरकार योग्य ती कार्यवाही करत आहे.पीएफआय सारख्या संघटनेवर बंदी आणणे म्हणजे भारताला वाचवणे आहे, या संघटनेने भारतामध्ये ज्या पद्धतीने आपले जाळे पसरून टार्गेट करायचे अशा संघटनांना यापूर्वीच बंदी घालायला हवी होती, पण आता योग्य काम झाले आहे. काँग्रेस सरकारच्या काळात या संघटना फोफावल्या, या संघटनेच्या लोकांना जिथे मिळेल तिथे झोडून काढले पाहिजे. शिंदे-फडणवीस सरकारने सर्वच धर्मांच्या सणांना निर्बंध मुक्त केले, त्यामुळे गेल्या वीस वर्षात उत्साहाने हे सण साजरे झाले नाही, तेवढा उत्साह यंदा आहे,"
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.