Chandrashekhar Bawankule | Uddhav Thackeray | Narendra Modi Sarkarnama
मुंबई

Chandrashekhar Bawankule : 'हिंदुत्व आमचं श्रध्दा, प्राण आणि श्वास'; ठाकरेंच्या टीकेवर बावनकुळे आक्रमक

Chandrashekhar Bawankule criticizes Uddhav Thackeray : बांगलादेशात हिंदुत्व होत असलेल्या अन्यायावरून उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतानाच चंद्रशेखर बावनकुळे यांचे आक्रमक प्रत्युत्तर दिले.

Pradeep Pendhare

Mumbai News : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अन्यायावरून केंद्रातील भाजप नरेंद्र मोदी सरकारवर टीका करताच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

"भाजपसाठी हिंदुत्ववाद हा राजकारणाचा विषय नाही, तर ती आमची श्रध्दा, प्राण आणि श्वास आहे. ज्यांनी सत्तेसाठी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रखर हिंदुत्ववादी विचार सोडले, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि भाजपचा हिंदुत्व शिकवू नये", असा टोला बावनकुळे यांनी लगावला.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अन्यायावर, हिंदूंची जाळली जात असलेल्या मंदिरांवरून केंद्रातील भाजप नरेंद्र मोदी सरकारला फटकारलं. केंद्रातील भाजप नरेंद्र मोदी सरकारने यावर चर्चा करावी. शिवसेनेचे खासदार याच मुद्यावर भेटण्यासाठी गेल्यावर त्यांना भेट नाकारली, असे सांगत भाजपचा हिंदुत्वाचा मुद्दा हा इलेक्शनपुरता हिंदूंची मत घेण्यापुरताच आहे, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. आता यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या एक्स खात्यावर पोस्ट शेअर करत जोरदार प्रत्युत्तर दिले.

भाजपचे (BJP) चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची औकात नाही. काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले, ते उद्धव ठाकरे आज हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलत आहेत. उद्धव ठाकरे तुमचं हिंदू प्रेम किती बेगडी होतं हे तुमच्या अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळात जनतेनं बघितलं. पालघरमध्ये झालेलं साधूंचं हत्याकांड आणि तुमची हिंदूविरोधी भूमिका महाराष्ट्रानं बघितल्याचा टोला लगावला.

'बांगलादेशमधील हिंदूच्या पाठीशी भाजप उभी आहे, हे सांगताना त्याचसाठी केंद्र सरकारनं 'नागरिकत्व दुरूस्ती विधेयक' मंजूर केलं. त्यावेळी तुम्ही मात्र काँग्रेसला घाबरून राज्यसभेत बोटचेपी भूमिका घेतल्याचा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. भाजपसाठी हिंदुत्ववाद हा राजकारणाचा विषय नाही, तर ती आमची श्रध्दा, प्राण आणि श्वास आहे', असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

'ज्यांनी सत्तेसाठी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रखर हिंदुत्ववादी विचार सोडले. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांचे चिरंजीव प्रियांक खरगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेली टीका, तसेच कर्नाटक विधानसभेतून सावरकरांची प्रतिमा काढण्याचा काँग्रेस नेते उद्दामपणा करतानाही तुम्ही अवाक्षर काढले नाही, यातूनच तुमची हिंदुत्ववादी तथाकथित निष्ठा समजते', असे टोला देखील चंद्रशेखर बानवकुळे यांनी लगावला. तुम्हाला विश्वगुरू पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाहीच, पण तुमची ती लायकी देखील नाही, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT