Uddhav Thackeray : 'बांगलादेशात मंदिर जाळली, हिंदूंवर अन्याय वाढलेत, 'विश्वगुरू' कोठेय?' ठाकरेंनी भाजपचा बुरखा फाडला ...पाहा VIDEO

Uddhav Thackeray Criticizes BJP : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत हिंदूंवर वाढलेल्या अत्याचारावर केंद्रातील भाजप सरकार काय भूमिका घेतली, यावर चर्चेची मागणी केली.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बांगलादेशात हिंदूंवर वाढलेल्या अत्याचारावर, अन्यायावर केंद्रातील भाजप नरेंद्र मोदी सरकारने काय भूमिका घेतली, यावर चर्चा करावी. शिवसेनेचे खासदार याच मुद्यावर भेटण्यासाठी गेल्यावर त्यांना भेट नाकारली, असे सांगत भाजपचा हिंदुत्वाचा मुद्दा हा इलेक्शनपुरता हिंदूंची मत घेण्यापुरताच आहे, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

तसंच सिडकोमधील मंदिराचा भूखंड कोणाला देणार आणि दादरमधील हनुमानाचं मंदिर हटवण्यासाठी नोटीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा हिंदुत्व जनतेसमोर मांडावे, असे म्हणत ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून भाजपला ललकारलं आहे.

शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबई 'मातोश्री' इथं पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी बांगलादेशात हिंदूंवर वाढलेल्या अत्याचार, अन्यायावरून केंद्रातील भाजप नरेंद्र मोदी सरकारला घेरलं. तसेच मुंबई सिडकोतील मंदिराचा भूखंड आणि दादर इथल्या हनुमान मंदिर हटवण्यासाठी काढलेल्या नोटीसवर प्रश्न केले. केंद्रातील आणि राज्यातील भाजपने यावर भूमिका स्पष्ट करावी, त्यानंतर मी माझी भूमिका काय आहे, स्पष्ट सांगतो, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

Uddhav Thackeray
Mahayuti Cabinet Expansion : शिंदेंकडून खात्यांची 'लिस्ट' वाढली, बसलेत अडून? भाजपकडून मनधरणी, तरच मंत्रिमंडळाचा शपथविधी

उद्धव ठाकरे म्हणाले, "देशाचे संसदेचे काम किती सुरळीत सुरू आहे, हे संपूर्ण देश पाहत आहे. सत्ताधारी भाजप (BJP) विरोधकांच्या विचारलेल्या प्रश्नांना किती समर्पक उत्तर देत आहेत, हे देखील जनता पाहत आहे. सत्ताधारी चर्चा कशी भरकटवत आहेत. यातच काही दिवसांपासून बांगलादेशात हिंदूवर अन्याय, अत्याचार वाढतले आहेत". असे असताना, बांगलादेशाचा क्रिकेट संघ देशात आला होता. त्यावर आदित्य ठाकरेंनी आक्षेप घेतला होता, पण त्यावर सत्ताधाऱ्यांनी कोणतेच उत्तर दिलं नाही. आता इस्कॉनचे मंदिर बांगलादेशात जाळले गेले. इस्कॉन मंदिराच्या प्रमुखांना अटक झाली. तरी देखील गप्प आहोत. रशिया-युक्रेन युद्ध विश्वगुरूंनी रोखले होते. मग बांगलादेशात काय प्रोब्लेम आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

Uddhav Thackeray
One Nation One Election : मोठी बातमी! ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी... आता पुढे काय?

पंतप्रधानांनी शिवसेना खासदारांना भेट नाकारली

निवडणुकीत बटेंगे, छटेंगे, कटेंगे, असा नारा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी शिवसेनेचे खासदार दिल्ली गेले होते. त्यांच्याबरोबर एक पत्र दिले होते. परंतु खासदारांनी भेट नाकारण्यात आली. शेख हसीना इकडे आल्या, त्या सुरक्षित आहे. पण तिथं अडकलेल्या हिंदूंचे काय? इलेक्शन पुरते त्यांचे हिंदुत्व होते का? मतांसाठी हिंदूंना बरोबर घेत असताना, तर हिंदूंना देखील भावना आहे. केंद्र सरकारने बांगलादेशातील हिंदुंच्या सुरक्षितेसाठी काय पावली उचलली यावर भूमिका स्पष्ट करावी. तसेच एक संसदेतील कामकाज संपूर्ण बाजूला सारून, त्यावर चर्चा करावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

मंदिरांच्या सुरक्षितेसाठी भाजपच्या भूमिकेची वाट पाहणार

उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या सिडकोतील मंदिराचा भूखंडावर देखील प्रश्न उपस्थित केला. हा भूखंड कोणाला देणार आहात, हे स्पष्ट करावे. तसेच दादर रेल्वे इथं हमालांनी 80 वर्षांपूर्वी बांधलेले हनुमानाची मंदिर हटवण्यासाठी नोटीस रेल्वे मंत्रालयाने दिली. ही नोटीस माझ्याकडे आहे. इथं फडणवीसांचे हिंदुत्व करा करतेय, ते देखील मला पाहायचे आहे, असे सांगितले. तसेच 'बटेंगे तो कटेंगे', हा नारा निवडणुकीपुरता होता का? हिंदुंना भयभीत करून, त्यांची मते घ्यायची.

बांगलादेशात आणि मुंबईत हिंदूंची मंदिरे सुरक्षित नाहीत. निवडणुकीच्या निकालाबद्दल जनतेला, त्यांना धक्का आहे. ज्या हिंदुंच्या मतावर तुम्ही निवडून आलात, त्यांना वाचवण्यासाठी हे काय करणार हे मी पाहणार आहे. या मुद्यांवर भाजपकडून उत्तर हवेच आहे. यानंतर मग मी दादरचे मंदिर वाचवण्यासाठी काय भूमिका घ्यायची ते मांडले, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com