Ramdas Athawale Sarkarnama
मुंबई

राज ठाकरेंची भाजपला गरज नाही, राष्ट्रीय स्तरावर नुकसानच होईल : आठवलेंचा इशारा

Ramdas Athawale : "राज ठाकरे चांगले नेते. सभा चांगल्या होतात. पण मते मिळत नाहीत."

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : भाजपासारख्या पक्षाला राज ठाकरेंची गरज नाही. भाजप-मनसे युती (BJP-MNS Alliance) घडून आली तर भाजपाला फायद्यापेक्षा नुकसान जास्त होईल. मुंबईतल्या मराठी माणसांचा विचार करून राज ठाकरेंना (Raj Thackeray) भाजप जवळ घेत असेल तर राष्ट्रीय स्तरावर पक्षाला याचा खूप मोठा फटका बसू शकतो, असा काळजीवजा सल्ला रिपब्लीकन पार्टी अॉफ इंडियाचे अध्यक्ष व केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी आपला मित्रपक्ष भाजपला दिला आहे. एका खाजगी वृत्तवाहिनीला रामदास आठवले यांनी आज मुलाखत दिली. यावेळी त्यांनी हे भाष्य केले आहे.

रामदास आठवले म्हणाले, मनसे सोबत भाजपने युती केली तर त्यांना उत्तर भारतीय तसेच दक्षिण भारतीय मते मिळणार नाहीत. राज ठाकरेंना सोबत घेतलं तर राष्ट्रीय स्तरावर पक्षाला नुकसान होऊ शकतं. राज ठाकरेंची भूमिका मराठीच्या मुद्दयासाठी महत्त्वाची आहे. पण मुंबईतल्या अमराठी लोकांना विरोध करण्याच्या भूमिकेमुळे भाजपाला हे परवडणारे नाही.

यावेळी त्यांनी राज ठाकरेंचं कौतुक देेखील केले आहे. रामदास आठवले म्हणाले, ‘राज ठाकरे हे चांगले नेते आहेत. त्यांच्या सभा चांगल्या होतात. पण त्यांना मते काही मिळत नाहीत. त्यामुळे राज ठाकरेंना भाजपने सोबत घ्यावं हे माझं मत नाही. भाजपला तशी गरज नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT