Devendra Fadanvis : अशोक चव्हाणांना भेटलोच नाही : फडणवीसांनी वृत्त फेटाळले

Devendra Fadanvis : "पुण्यातून लोकसभाही मी लढवणार नाही," असेही फडणवीस म्हणाले.
Devendra Fadanvis & Ashok Chavhan
Devendra Fadanvis & Ashok Chavhan
Published on
Updated on

पुणे : काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची गुरुवारी (ता. १ सप्टेंबर) भाजप (BJP) पदाधिकाऱ्याच्या घरी भेट झाली आहे. या दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या भेटीसंदर्भात फडणवीस यांची प्रतिक्रीया आली आहे. अशोक चव्हाण आणि माझी कोणतीही भेट झाली नाही, असे स्पष्टीकरण देत, त्यांनी या भेटीचा दावा फेटाळून लावला आहे. ते आज पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Devendra Fadanvis & Ashok Chavhan
मुरलीधर मोहोळ राज्याच्या राजकारणात ? : नव्या नियुक्तीमुळे तर्क-वितर्कांना उधाण

फडणवीस म्हणाले, अशोक चव्हाण आणि माझी भेट झालेली नाही. आम्ही गणपती निमित्त एका कार्यक्रमाच्या ठिकाणी एकत्र आलो होतो. आमच्यात कसलीही चर्चा झाली नाही. तसेच मी पालकमंत्री म्हणून पुण्याला येणार नाही. पुण्यातून लोकसभाही मी लढवणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आज पुण्यात पीएमपी इलेक्ट्रीक बसेस आणि चार्जिंग स्टेशन्सच्या उद्धाटनाच्या कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमाला फडणवीस उपस्थित होते.

Devendra Fadanvis & Ashok Chavhan
फडणवीस म्हणतात, मी महाराष्ट्रात तुम्हाला नकोय का?

दरम्यान काल (१ सप्टेंबर) भाजप आणि शिंदे गटात समन्वयासाठी नियुक्त करण्यात आलेले भाजपचे पदाधिकारी आशिष कुलकर्णी यांच्या घरी अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे. फडणवीस हे कुलकर्णी यांच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी गेले हेाते. नेमके त्याचवेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण त्या ठिकाणी गेले हेाते. त्यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे ही चर्चा राजकीय असल्याचे सांगण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com