devendra fadnavis sarkarnama
मुंबई

पक्षश्रेष्ठींनी सांगितले असते तर मी घरी गेलो असतो ; फडणवीसांचे स्पष्टीकरण

राष्ट्रवादीसोबत जायचं हे शिवसेनेने आधीच ठरवल होतं," असा दावा फडणवीसांनी केला.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भाजपची (bjp) आज पनवेल येथे प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis)यांनी आपण उपमुख्यमंत्री झाल्याबाबतचे स्पष्टीकरण दिलं. (devendra fadnavis latest news)

फडणवीस म्हणाले, "एकनाथ शिंदे हे ठरवून मुख्यमंत्री झाले. मला पक्षश्रेष्ठींनी घरी जाण्यासाठी सांगितले असते तर मी घरी गेलो असतो. पण सत्तेत भाजपचा सहभाग पाहिजे म्हणून पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आदेशाचं पालन करुन मी उपमुख्यमंत्री झालो, मला उपमुख्यमंत्रीपदासाठी पक्षाने आग्रह करणे हा खरे तर माझ्यासाठी अभिमानाचा क्षण होता."

"राज्यात 2019 च्या निवडणुकीनंतर आमच्यासोबत शिवसेनेकडून षडयंत्र झालं. आपण निवडणुकीच्या काळात आपल्या शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार निवडून येण्यासाठी आपले बंडखोर उमेदवार मागे घेतले. शिवसेनेच्या उमेदवारांना मदत केली. पण राष्ट्रवादीसोबत जायचं हे शिवसेनेने आधीच ठरवल होतं," असा दावा फडणवीसांनी केला.

"शिवसेनेने आमच्याशी बेईमानीच केली. ती शिवसेना म्हणजे आता अल्पसंख्यात उरली आहे. आपल्यासोबत खरी शिवसेना आहे. कारण शिवसेना पक्ष नाही तर विचार आहे. आणि ते विचार जे जिवंत ठेवतील तीच खरी शिवसेना. तो विचार जिवंत ठेवण्याचं काम एकनाथ शिंदे करत आहेत. मी स्वत: याचा साक्षीदार आहे," असे फडणवीस म्हणाले.

पनवेल येथील भाजपच्या बैठकीत फडणवीस म्हणाले..

  1. भाजप सत्तापिपासू नाही. केवळ आमचा मुख्यमंत्री बनला पाहिजे म्हणून आम्ही सरकार पाडतो, अशापैकी आम्ही नाही आहोत. आमची विचारांची लढाई आहे.

  2. संघर्षाच्या काळात जसे आपण एक होतो, तसेच समाजासाठी काम करतानाही तीच एकजूट दाखवा

  3. शिवसेनेला कोणताही शब्द दिलेला नव्हता. त्यांनी त्यांचे मार्ग खुले ठेवण्याची घोषणा केली होती. मी फोन करायचो, पण प्रतिसाद नसायचा. आज जी वेळ त्यांच्यावर आली

  4. ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, ही घोषणा झाली त्यावेळेस आपल्यापैकी अनेकांना आश्चर्य वाटलं. पण हे काही अचानक घडलं नव्हतं. हे ठरवून घडलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT