गोगावलेंचे चंद्रकांतदादांना सडेतोड उत्तर ; भाजप-शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस बाहेर

"चंद्रकांतदादा बोलतात त्याप्रमाणे आम्ही पण तोच त्याग केला आहे. आम्ही पण आमच्या छातीवर किती दगड ठेवलं ते आम्हालाच माहित आहे.
Chandrakant Patil,Bharat Gogawale
Chandrakant Patil,Bharat Gogawalesarkarnama
Published on
Updated on

मुंबई : "मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले.आपल्याला दुःख झाले, पण आपण दुःख पचवून पुढे गेलो. कारण आपल्याला गाडा पुढे हाकायचा होता," असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं. चंद्रकांतदादांच्या या विधानाने आता भाजप-शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस बाहेर यायला सुरवात झाल्याचे दिसते. (Bharat Gogawale news update)

पनवेलमध्ये जाहीर भाषणात चंद्रकांतदादांनी ही खदखद बोलून दाखविली. पनवेलमध्ये प्रदेश कार्यकारीणी बैठकीत त्यांनी हे विधान केले त्यांच्या या विधानाचे पडसाद उमटू लागले आहेत. शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी पाटलांना त्यांचे उत्तर दिलं. गोगावले माध्यमांशी बोलत होते.

गोगावले म्हणाले,"चंद्रकांत दादा त्यांच्या बैठकीत काय बोललं, हे माहित नाही. पण आम्ही ४०-५० आमदार सत्ता सोडून आलो ते असेच आलो आहोत का,आम्ही जर सत्ता सोडली नसती तर मग आमची युती झाली असती का? चंद्रकांतदादांचे जे वरिष्ठ नेते आहेत,त्यांनी तो योग्य निर्णय घेतला आहे,"

"चंद्रकांतदादांना दु:ख वाटण्याचे काही कारण नाही. त्यांचे पक्षश्रेष्ठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी हा निर्णय घेतला आहे. शिंदे यांच्याजवळील ४० आणि अन्य १० आमदार सत्तेतून बाहेर पडले नसते, तर शिवसेना-भाजप युती झाली नसती, युतीचं सरकार आलं नसतं,"असे गोगावले यांनी नमूद केले.

"चंद्रकांतदादा बोलतात त्याप्रमाणे आम्ही पण तोच त्याग केला आहे. आम्ही पण आमच्या छातीवर किती दगड ठेवलं ते आम्हालाच माहित आहे. चालू सत्तेतून पायउतार होऊन आम्ही आलो आहे. चंद्रकांतदादा बोलले असले तरी त्याचा अर्थ आम्हाला समजलेला नाही, आम्ही जे सांगतो ते योग्य आहे," असे गोगावले म्हणाले.

Chandrakant Patil,Bharat Gogawale
पुरंदरेंनी छत्रपतींवर अन्याय केला, त्यांचे लिखाण मला कधीच पटले नाही : पवारांचा हल्लाबोल

चंद्रकांत पाटील म्हणाले होते की राज्याला असा नेता देण्याची आवश्यकता होती की ज्याच्यातून योग्य मेसेज जाईल. आपण जे काही करत आहोत त्याला स्थिरता येईल. त्यामुळे अक्षरश: मनावर दगड ठेवून आपल्या केंद्रीय नेतृत्त्वाने, आपण सर्वांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. आपल्याला दुःख झालं, पण आपण ते दुःख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला गाडा पुढे हाकायचा होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com