Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray News : भाजपने शिंदे सेनेला संपवले; उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले?

संदीप पंडित

Mumbai Political News : आमचा पक्ष, आमचे चिन्ह, आमचे सर्व काही चोरले, तरी त्यांचे समाधान होत नाही. आता आमच्या वडिलांवर हक्क सांगायला निघाले आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे अजूनही स्वतःच्या मुलाची उमेदवारी जाहीर करू शकले नाहीत. पालघरचा उमेदवार जाहीर करू शकले नाहीत. इतके भाजपने त्यांना संपवून टाकले, तरी त्यांच्या लक्षात येत नाही, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली.

पालघर येथील बोईसर येथे उमेदवार भारती कामडी Bharti Kamadi यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप आमच्या सामान्य कार्यकर्त्यांना खिचडी प्रकरणात ईडी, सीबीआयच्या नोटिसा पाठवतात. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तपास यंत्रणा जाग्या होतात. आठ हजार कोटी रुपयांचे निवडणूक रोखे घोटाळे करणाऱ्यांना मात्र अभय कसे दिले जाते, असा सवाल करून पीएम केअर फंडाच्या लाखो कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे, असा निशाणाही ठाकरेंनी भाजपवर साधला आहे.

देशात कोणतेही सरकार हे त्या देशाचे असते किंवा पक्षाचे असते; परंतु हे देशापेक्षा मोठे व्हायला निघाले आहेत. देशाच्या सरकारऐवजी मोदी सरकार Narendra Modi म्हणायला लागले आहेत. मोदी यांनी अचानक आठ नोव्हेंबरला टीव्हीवर येऊन उद्यापासून या नोटा कचऱ्याचे तुकडे होतील, असे जाहीर करून जनतेला रस्त्यावर आणले. त्याच मोदींचे नाणे बनावट असून आता त्यांना हद्दपार करण्याची वेळ आली आहे. मोदींचे नाणे आता चालणार नाही, असा घणाघातही ठाकरेंनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरे Uddhav Thackeray या वेळी वाढवण बंदराबाबत भाष्य केले. वाढवण बंदर त्यांच्या मित्राच्या खिशात नफा घालण्यासाठी आहे. येथील मच्छीमार, शेतकरी याची त्यांना तमा नाही. हे बंदर झाल्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळणार नाही. पालघरला वाढवण बंदराच्या विकासाऐवजी विमानतळाची गरज आहे, असे सांगून ते म्हणाले की मित्राचे खिसे फाडून आम्ही पालघरचा विकास करू. त्यासाठी पालघरचे पर्यटन विकास, गडकिल्ले संवर्धन, आदिवासी संस्कृती, वारली कलेचे जतन करू. महाराष्ट्रातील एकही एकही प्रकल्प गुजरातला जाऊ देणार नाही. त्याला प्राणपणाने विरोध करू, असे त्यांनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT