Ravindra Waikar News : शिंदे घेणार मोठा निर्णय; कीर्तीकरांना डच्चू तर ठाकरेंची साथ सोडलेल्या वायकरांना थेट लोकसभेचं तिकीट?

North West Mumbai Lok Sabha Constituency : भाजपला संपूर्ण पाठिंबा देऊ, मात्र विरोधकांचा मान राखावा. चारशे पारच काय भाजपने संपूर्ण संसदच ताब्यात घ्यावी. हे करताना मात्र मित्रपक्ष आणि विरोधकांची अडचण करू नये, असे म्हणत गजानन कीर्तीकरांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर टीका केली.
Ravindra Waikar
Ravindra WaikarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : उत्तर-पश्चिम मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना Uddhav Thackeray चितपट करण्याची तयारी केली आहे. शिंदे, ठाकरेंचा एकेकाळचा खंदा शिलेदार, जोगेश्वरीचे आमदार रवींद्र वायकारांनाच येथून रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत. परिणामी येथून खासदार गजानन कीर्तीकरांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. तसे झाले तर उत्तर-पश्चिम मुंबईतून ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर विरुद्ध शिंदे गटाचे रवींद्र वायकर अशी लढत होणार आहे. Eknath Shinde May choose Ravindra Waikar Against Amol Kirtikar.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. त्यात आमदार रवींद्र वायकरांना उमेदवारी देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. वायकरांनी गेल्या महिन्यातच शिंदे गटात प्रवेश केला आहे. ईडीची कारवाई टाळण्यासाठीच वायकर महायुतीत गेल्याचा आरोप ठाकरेंनी केला होता. सर्वात शेवटी शिंदे गटात दाखल होऊनही वायकरांना लोकसभेचे तिकीट मिळणार असल्याची माहिती पुढे येत आहे. उत्तर-पश्चिम मुंबईत सध्या शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तीकर हे खासदार आहेत.

गजानन कीर्तीकरांनी Gajanan Kirtikar , चिरंजीव तथा ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकरांवर होणाऱ्या ईडी चौकशीवरून भाजपला लक्ष्य केले. भाजपला संपूर्ण पाठिंबा देऊ, मात्र विरोधकांचा मान राखला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. चारशे पारच काय भाजपने संपूर्ण संसदच ताब्यात घ्यावी. हे करताना मात्र मित्रपक्ष आणि विरोधकांची अडचण करू नये, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे आपला मुलगा अमोल कीर्तीकर यांची पाठराखण केली होती. त्यामुळे आता गजानन कीर्तीकरांऐवजी वायकरांचे नाव पुढे येत असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी गजानन कीर्तीकरांनी लोकसभेत महायुतीचेच काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Ravindra Waikar
Girish Mahajan @ Latur : पालकमंत्री असूनही गिरीश महाजन गुपचूप लातुरात; काय आहे कारण?

रवींद्र वायकर Ravindra Waikar हे जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघातून तीनदा आमदार झाले आहेत. तत्पूर्वी ते सलग चारवेळा नगरसेवक होते. मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्षपदी त्यांनी भूषवले आहे. आता दोन दिवसांत येणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या लोकसभा यादीत वायकरांचे नाव असण्याची चर्चा आहे. तसे झाले तर उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर आणि शिंदे गटाचे रवींद्र वायकर अशी लढत होण्याची शक्यता आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Ravindra Waikar
Satara NCP News : संघर्षाच्या काळात शरद पवार गटात 'नाराजीनाट्य'; सुनील माने वेगळी भूमिका घेणार...?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com