Vijay Wadettiwar Sarkarnama
मुंबई

Vijay Wadettiwar : सरकार निवडणुकांची वाट पाहतेय का? कांदा निर्यातबंदीवरून वडेट्टीवार यांचा सवाल

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी पूर्वीच्या घोषणेप्रमाणे 31 मार्चपर्यंत कायम ठेवली आहे. 8 डिसेंबर 2023 रोजी सरकारने 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घातली होती. त्यात कोणताही बदल केंद्र सरकारने केला नाही. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार असून, केंद्र सरकार शेतकरीविरोधी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याची खरमरीत टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

निर्यातबंदी उठविण्यासाठी सरकार निवडणुकांची वाट पाहतेय काय? असा संतप्त सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते म्हणाले, स्वतःच्या सरकारने लादलेली कांदा निर्यातबंदी हटवण्यात आल्याचा जल्लोष करून स्वतः श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न राज्यातील भाजपचे मंत्री आणि नेत्यांनी केल्याचे आता उघड झाले आहे. गाजावाजा करत जल्लोष करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भ्रमित करण्याचा भाजपचा हा प्रयत्न होता का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निर्यातबंदी उठवण्यात आलेली नाही. सद्य:स्थितीत केंद्र सरकारच्या निर्णयात कोणताही बदल होणार नाही, असे केंद्राकडून सांगण्यात आले आहे. स्वतःच्या पक्षाने चुकीचे निर्णय घ्यावेत आणि नंतर तो निर्णय बदलून शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी निर्णय घेतल्याचा आव आणणे आता भाजपने बंद करावे. निवडणूक आणि श्रेयवादाचं राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या आणि राज्यातील जनतेच्या हिताचे सरकारने निर्णय घ्यावेत, अन्यथा जनता माफ करणार नाही, असेही वडेट्टीवार यांनी सुनावले आहे.

दरम्यान, कांदा निर्यातबंदीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी भाजप सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेत टीकास्त्र सोडले. कांदा निर्यातबंदी उठवली म्हणून काही जण उगाच टाळ्या वाजवत होते. सत्य परिस्थिती ही आहे की, कांदा निर्यातबंदी उठवलीच गेली नाही. व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा, असा या सरकारचा नारा असल्याचे जयंत पाटील यांनी ट्विट केले आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT