Congress Criticizes BJP : भाजप लोकशाहीसाठी कलंक; काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा घणाघात

Shivajirao Moghe's Criticism of BJP : नांदेडची जागा सर्वाधिक मताधिक्याने निवडून येईल, असा विश्वास केला व्यक्त.
BJP, Congress
BJP, CongressSarkarnama
Published on
Updated on

Nanded Political News : केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधी पक्षाचे सरकार पाडणे, नेत्यांवर दबाव आणून फोडने व पक्षात प्रवेश देणे, असे लोकशाहीविरोधी काम भाजप करीत आहे. भाजप लोकशाहीसाठी कलंक आहे, असा घणाघात माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी मंगळवारी (ता 20) भाजपवर केला. तसेच ज्या सर्वाधिक मताधिक्याने पाच जागा काँग्रेसच्या येतील, त्यात नांदेडच्या जागेचा समावेश असेल, असा विश्वास मोघे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे खूप मोठे नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्यात संभाव्य पडझड थांबवून पक्षाला उभारी देण्यासाठी पक्ष निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी मंत्री शिवाजीराव मोघे, अनिल पटेल (Anil Patel) यांनी नांदेड येथील पक्ष कार्यालयात जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पक्षाचा संघटनात्मक पातळीवर परिस्थितीचा आढावा घेतला.

तसेच विधानसभानिहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत मते जाणून घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. या वेळी जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे - नागेलीकर, माजी आमदार हनुमंतराव पाटील - बेटमोगरेकर, माजी आमदार ईश्वरराव भोसीकर आदी उपस्थित होते.

BJP, Congress
'Maratha Reservation' मराठा आरक्षण विधेयकावर संभाजीराजेंनी दिला 'हा' सल्ला; म्हणाले...

शिवाजीराव मोघे म्हणाले, नांदेड हा कोण्या नेत्याचा बालेकिल्ला नव्हता. तो काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. आमच्यासाठी लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले असले तरी पदाधिकारी व कार्यकर्ते, सामान्य नागरिक काँग्रेससोबत आहेत, असे मोघे यांनी ठामपणे सांगितले.

नांदेडची जागा काँग्रेसलाच सुटणार आहे. या जागेवर काँग्रेस तगडा उमेदवार देणार आहे. भाजपत गेलेले काँग्रेसचे नेते आमच्या संपर्कात आहेत. महाविकास आघाडी नांदेडची जागा एकदिलाने काम करून लढेल व जिंकेल, असा विश्वास मोघे यांनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संघटनात्मक पातळीवर बदल होणार का, असे विचारले असता मोघे म्हणाले, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेससोबत आहेत. जिल्ह्यातील संघटनात्मक पातळीवरचा अहवाल प्रदेश कार्यालयाला देण्यात येईल. बदल करण्याबाबतचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील, अशी माहिती त्यांनी दिली.

(Edited by Amol Sutar)

R

BJP, Congress
Chiplun Clash : चिपळूण राडा; हा तर भास्कर जाधवांनी रचलेला मोठा कट..!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com