BMC Elections Raj Thackeray Uddhav Thackeray devendra fadnavis sarkarnama
मुंबई

BJP Gujarati Card : ठाकरे बंधूंना मुंबईत रोखण्यासाठी गुजराती मतांचे एकीकरण, भाजपचा 'मास्टर प्लॅन'

BMC Elections Raj Thackeray Uddhav Thackeray BJP : आशिष शेलार मंत्री असलेल्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मराठी विरुद्ध गुजराती असा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Roshan More

BMC Elections : आगामी मुंबई महापालिकेच्या दृष्टिने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मराठीच्या मुद्यावर ठाकरे बंधू एकत्र येत असताना भाजपची मोठी कोंडी होणार आहे. ठाकरे बंधूकडे मराठी मतदार एकटला तर आगामी मुंबई महापालिका भाजपला जड जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, मराठीच्या मुद्यावर एकत्र येत असलेल्या ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी भाजप 'गुजराती कार्ड' पुढे करणार आहे.

गुजरात मतदारांना एकवटण्याचा प्लॅन भाजपने सुरू केला आहे. उत्तर भारतीय मतदारांना आपल्याकडे वळवत त्या जोडीला गुजराती मतदार असतील तर ठाकरे बंधुंना सहज रोखता येऊ शकते ही रणनीती भाजपने आखली आहे.आज (शुक्रवार) महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्यावतीने गुजराती नाट्यप्रयोग मुंबईतील कांदिवली पूर्व येथे होणार आहे.

आशिष शेलार मंत्री असलेल्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मराठी विरुद्ध गुजराती असा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मनसेच्या काही नेत्यांनी या नाट्यप्रयोगाला विरोध देखील केला आहे.

मुंबईच्या लोकसंख्येचा विचार करता मराठी आणि हिंदी भाषिकांच्या पाठोपाठ गुजराती भाषिकांची संख्या सर्वाधिक आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार मुंबईत तब्बल 12 टक्के गुजराती भाषिक आहेत. तर, हिंदी भाषिक 22.98 टक्के आहे. तर, उर्दू भाषिकांची संख्या 13.53 टक्के आहे. त्यामुळे मराठीच्या मुद्दा लावून धरणाऱ्या ठाकरे बंधूंच्या विरोधात इतर भाषिकांना एकत्र करण्याच्या दृष्टिने भाजप पावले टाकत आहेत.

35 टक्के मराठी भाषिक

मुंबईत गुजराती भाषिक हे 12 असल्याने भाजप ठाकरे बंधुंच्या विरोधात त्यांना एकटताना दिसत आहे. तर, 2011 च्या जनगणनेनुसार मुंबईत मराठी भाषिकांची संख्या 35.96% आहे. मराठीचा टक्का मुंबईतून कमी होत असल्याचे देखील सांगितले जात आहे. तब्बल 14 वर्षांपासून जनगणना झालेली नाही त्यामुळे आता गुजराती आणि मराठी भाषिकांच्या संख्येत नेमका किती बदल झाला आहे याची ठोस आकडेवारी नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT