devendra fadnavis sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis : 'लाडक्या बहीणीं'साठी भाजपचं नवीन गाणं; 'बहिणींचा भाऊ, देवा भाऊ'

ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा घेण्यासाठी भाजपने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय ठेवून गाणं बनवलं आहे.

सरकारनामा ब्यूरो

Devendra Fadnavis Deva Bhau Song : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचं श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी महायुतीमधील तीनही पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. शिवसेना ( शिंदे गट ) आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( अजितदादा पवार ) यात पुढं आहेत. भाजपनं देखील आता यात आघाडी घेण्याचं ठरवलं असून, वेगळ्यापद्धतीनं जाहिरात करत मतदारापर्यंत जाण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपकडून 'लाकडी बहीण योजने'च्या प्रचारासाठी 'बहिणींचा भाऊ, देवा भाऊ', अशा आशयाच्या गाण्यांमार्फत जाहिरात केली जात आहे.

विधानसभा निवडणुका राज्यात कधीही घोषणा होऊ शकते. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर भाजपकडून विधानसभेत कोणतीही उणिव ठेवायची नाही, असा चंग बांधला आहे. भाजपच्या केंद्रातील नेत्यांचे महाराष्ट्रात दौरे वाढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ), केंद्रीय मंत्री अमित शाह, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी खुद्द महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी लक्ष घातलं आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचं नेतृत्त्व भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्याकडे असणार आहे. सत्ताधारी महायुतीकडून राज्यातील सत्ता कायम टिकवण्यासाठी लोकप्रिय घोषणांची सपाटा लावला आहे. यात 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे. महाराष्ट्रात कमी कालावधीत ही योजना महिलांपर्यंत पोचली असून, लाभार्थी महिलांना दर महिन्याला प्रत्येकी दीड हजार दिले जात आहे. या योजनेचं श्रेयासाठी महायुतीमधील शिवसेना ( शिंदे गट ) आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( अजितदादा पवार ) सर्वात पुढं आहेत.

या योजनेचं श्रेय घेण्यात भाजप काहीसा कमी पडत होता, यातच भाजप आमदारांची या योजनेबाबत निवडणुकीसाठी जुगाड, अशी वादग्रस्त विधान करत होते. यावर आता भाजपने काम करायला सुरवात करत, या योजनेचा फायदा निवडणुकीच्या काळात होण्यासाठी तयारी केली आहे. यासाठी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केंद्रीत ठेवत जाहिरात केली गेली आहे. बहिणींचा भाऊ ‘देवा भाऊ’ या गाण्यांमार्फत जाहिरात केली आहे.

'लाडकी बहीण योजने'मुळे 'देवा भाऊ' म्हटलं जाऊ लागलं का? यावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले की, "'देवा भाऊ', या नावानं मला आधीपासूनच काही जण बोलवतात. परंतु, लाडकी बहीण योजनेनंतर हे नाव अधिकच प्रसिद्धीस आले."

‘देवा देवा, देवा भाऊ’ असे या गाण्याचे बोल आहेत. तर त्या गाण्यात रामभक्त आणि शिवभक्त म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा, उल्लेख केला गेला आहे. तसंच या गाण्यामार्फत देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या जनतेसाठी राबवलेल्या योजनांचा देखील संदर्भ दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीत ठेवून बनवलेलं हे गाणं विधानसभा निवडणुकीत त्यांच्यासाठी आणि भाजप पक्षासाठी कितपत फायदेशीर ठरते, हा येणार काळच सांगेल. तसंच लाडकी बहीण योजनेचा संदर्भ घेऊन आता शिवसेना ( शिंदे गट ) आणि राष्ट्रवादी ( अजितदादा पवार ) यांच्याकडून प्रचाराचे कोणते गाणे वाजवले जाईल, याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT