Rape Case sarkarnama
मुंबई

Rape Case : मैत्री केली अन्...,भाजप नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा, तीन लग्न लपवली?

BJP Laxman Jangam : मैत्रीच्या बहाण्याने लग्नाचे अमिष प्रलोभन दाखवत भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांनी एका महिलेवर अत्याचार केला.

सरकारनामा ब्यूरो

प्रकाश लिमये

Rape Case News : मीरा-भाईंदर महापालिकेतील भाजपचे नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्यावर एक महिलेवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी मिरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेने पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार तीची जंगम यांच्यासोबत २०२२ मध्ये ओळख झाली. सुरुवातीला पीडितेचे  जंगम यांच्यासोबत  मैत्रीचे संबंध होते.

काही काळानंतर  मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधामध्ये झाले. त्यानंतर जंगम यांनी लग्न करणार का अशी विचारणा केली असता पीडितेने होकार दिला.  जंगम याने लग्नाचे प्रलोभन दाखवून  पीडितेच्या  मुलाचा संभाळ करेन तसेच नवे घर व  दुकानाचे गाळे घेईन असे सांगितले.

पीडितेचा विश्वास जिंकल्यांनातर जंगम यांनी पीडितेसोबत त्याच्या कार्यालयात, लॉज मध्ये पीडितेची इच्छे विरोधात तिच्यासोबत अनेकवेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडितेने लग्नाबाबत विचारले  असता जंगम याने टाळाटाळ करायला सुरुवात केली व पीडितेकडे  दुर्लक्ष करू लागला.

जंगम याचे अन्य महिलांशी देखील संबंध असल्याचे व त्याची तीन लग्न झाल्याचे पीडितेला समजले त्यामुळे त्यांच्यात सतत भांडणे होऊ लागली. जंगम याचा हेतु चांगला नसल्याचे लक्षात आल्याने पीडितेने लक्ष्मण जंगम याच्याशी संपर्क कमी केला. दरम्यान  काही दिवसानंतर पीडितेची दुसऱ्या इसमासोबत मैत्री झाली.

परंतु त्यानेदेखील पीडितेला  ब्लॅकमेल करून तिच्याशी शारीरीक संबंध ठेवल्याने पीडितेने त्याच्या विरोधात नयानगर पोलीस ठाण्यात तक्रार केली.  त्यानंतर  लक्ष्मण जंगम याने पीडितेच्या वडीलांना फोन करून तीची बदनामी केली आणि पोलीसात तक्रार दिल्यास बघून घेण्याची धम‌की दिली. अखेर पीडितेने जंगम याच्या विरोधात सोमवारी (ता.२०) रात्री मिरा रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT