Mumbai News : वरळीतील हिट अँड रन प्रकरणावर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर घेरत आहेत. माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी सत्ताधाऱ्यांची या घटनेवरून कोंडी केली असतानाच, भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्या दुहेरी भूमिकेवर विनंती करताच जोरदार चिमटा काढला.
'कावेरी नखवा यांची दुर्दैवी हत्या मृत्यू झाल्यानंतर किमान कोणाच्या लग्नाच्या पार्टी नाचू तरी नका', असा टोला शेलार यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. आशिष शेलार यांनी हा टोला अंबानी यांच्या घरी सुरू असलेल्या विवाह सोहळ्यात ठाकरे परिवाराच्या सहभागावरून लगावला आहे.
वरळीतील 'हिट अँड रन' प्रकरणात कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. हीच भाजपची भूमिका असल्याचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सांगितले. आमदार शेलार यांनी भाजपची भूमिका मांडल्याने, महायुतीत शिवसेना एकनाथ शिंदे गट या मुद्यावर एकटाच पडला आहे. ही घटना आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात घडली आहे.
घटनेच्या पहिल्या दिवसापासून आदित्य ठाकरे यावरून आक्रमक आहे. घटनेतील मयत कुटुंब नखवा यांच्या घरी देखील आदित्य ठाकरे गेले होते. त्यामुळे आदित्य ठाकरे प्रत्येक ठिकाणी या घटनेवरून भाजप महायुतीची कोंडी करत असतानाच आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांना त्यांच्या दुहेरी भूमिकेवरून जोराचा चिमटा काढला आहे.
आशिष शेलार यांनी पबसह राजेश शाह यांच्या अधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी करत आदित्य ठाकरे यांच्या दुहेरी भूमिकेबाबत विनंती करत टोला लगावला. "कावेरी नखवा यांचा दुर्दैवी हत्या मृत्यू झाली असताना किमान कोणच्या लग्नाच्या पार्टीत नाचू, तरी नका. स्वतः जायचे कोणाच्या तरी पार्टीत नाचायला. वरळीत आमच्या कोळी कुटुंबाच्या दुःखाला फुंकर मारण्याचे नाटक दाखवायचं, हे आदित्य ठाकरे यांनी करू नये", अशा शब्दात आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांना सुनावले आहे.
आशिष शेलार यांनी या घटनेतील दोषीवर कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. तशी भाजपची भूमिका आहे. आवश्यकता वाटल्यास कडक कलम लावली पाहिजेत. लावलेल्या कलमावर दुःखी कुटुंब प्रश्न उपस्थित करत असेल, तर त्यावर त्या कुटुंबाचे ऐकले गेले पाहिजे. नखवा कुटुंबाला संपूर्ण मदत मिळाली पाहिजे. त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. पबवर कारवाई करा. राजेश शाह यांची अधिकृत बांधकामे असतील, तर त्याच्यावर कारवाई करा, अशी मागणी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.