मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे-पाटील यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली होती. विषप्रयोगाचाही आरोप जरांगेंनी केला होता. त्यावर भाजप नेते आशिष देशमुख यांनी तेवढंच कडक उत्तर दिलं आहे. जरांगे-पाटील कुणाच्या सांगण्यावरून बोलत आहेत, असा सवाल त्यांनी विचारला आहे. या निमित्तानं भाजपचे नेते आता जरांगे-पाटील यांना तोडीस तोड उत्तरं देत असल्याचं चित्र आहे.
भाजप नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. जरांगे-पाटील यांना कुणीतरी ऑपरेट करतोय, असा आरोप त्यांनी केला आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) मार्गी लागल्यानंतर सर्व मराठा समाजाच्या हिताचं होत असताना, जरांगे पाटील यांची राजकीय महत्त्वाकांक्षा जागृत झालीय. त्यामुळे मराठा समाजाला हाताशी धरुन जरांगे आपली राजकीय पोळी शेकून घेत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दिलेलं आरक्षण ठाकरे मुख्यमंत्री असताना सुप्रीम कोर्टात (Supreme Court) टिकले नाही. आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारने 10 टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलेले आहे. मराठा समाजाचं हित होत असताना जरांगेंचा वापर कुणीतरी राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी करत आहे. त्यामुळे काहीही बोलण्याचा जरांगेंचा (Manoj Jarange Patil) केविलवाणा प्रयत्न सुरू आहे, असं देशमुख यांचा आरोप आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यामुळे आता जरांगेंनी श्रद्धेनं, सबुरीनं घ्यावं आणि बालहट्ट् सोडावा असा सल्ला आशिष देशमुख यांनी दिला आहे. त्याचवेळी सरकार मराठा आरक्षणासाठी सकारात्मक असून 'सगेसोयरे' शब्दासाठी अधिसूचना काढली. त्यामुळे घिसाडघाई करू नका, असा सल्ला देशमुखांनी जरांगेंना दिला आहे. त्याचवेळी वैयक्तिक द्वेषातून जरांगेंनी केलेल्या टीकेचा आशिष देशमुख यांनी निषेध केला आहे.
(Edited by Avinash Chandane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.