Devendra Fadnavis News : इतकं मूर्खपणाचंं लक्षण कुठल्या माणसामध्ये पाहिलं नाही !

Dr. Sanjay Kute : फडणवीसांचे निकटवर्तीय आमदार संतापले !
Dr. Sanjay Kute, Manoj Jarange and Devendra Fadanvis
Dr. Sanjay Kute, Manoj Jarange and Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : मनोज जरांगेंनी फडणवीसांबद्दल केलेल्या वक्तव्यावर महायुतीतील पक्षप्रमुखांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवीत जरांगेंवर शाब्दिक हल्ला चढविला.

डॉ. कुटे म्हणाले, इतकं मूर्खपणाचं लक्षण कुठल्या माणसामध्ये असावं, असं मी पाहिलं नाही. मराठा आंदोलक आणि मनोज जरांगे यांचे सहकारी अजय महाराज बारस्कर यांनी जरांगे पाटलांबद्दल अनेक धक्कादायक खुलासे करत त्यांच्यावर टीकास्त्र डागले.

त्यांच्यापाठोपाठ आणखी एका मराठा आंदोलक महिलेने मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार यांचा हात आहे, असा गंभीर आरोप मराठा आंदोलक महिला संगीता वानखेडे यांनी केला.

वानखेडे यांच्या आरोपाचा धागा पुढे नेत फडणवीसांचे अत्यंत विश्वासू सहकारी तथा मराठा-ओबीसी नेते, माजी राज्यमंत्री, आमदार डॉ. संजय कुटे यांनीही हल्ला चढविला आहे. ते म्हणाले की, जरांगे पाटील यांच्या संदर्भात मी विधानसभेत बोललो होतो.

एकेरीत बोलण्याची भाषा महाराष्ट्रात शोभत नाही आणि त्यांनी बोलण्याचा कळस गाठला आहे. हेकेखोरपणा आणि ज्या पद्धतीने शब्द वापरले जातात ते मराठा समाजालासुद्धा पसंत नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dr. Sanjay Kute, Manoj Jarange and Devendra Fadanvis
MLA Dr. Sanjay Kute : अन आमदार स्वतः लाठी-काठी फिरवतात तेव्हा...

आम्ही उलट जरांगे पाटलांचा निषेध करतो. सलाइनमधून विष दिले जात आहे. हे दिल्या जाईल, ते दिल्या जाईल, इतकं मूर्खपणाचं लक्षण कुठल्या माणसामध्ये असावं, असा माणूस आम्ही आतापर्यंत पाहिला नाही आणि ज्या पद्धतीने सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

समाज पेटविण्याचा प्रयत्न आहे, परंतु मराठा समाज या अशा कधीही पेटवापेटविला बळी पडणार नाही. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असो, देवेंद्र फडणवीस असो, या प्रकारचं कट कारस्थान करण्याची कोणालाही गरज नाही. त्यातल्या त्यात जरांगे-पाटलासाठी काहीही विषय करण्याची गरज नाही. मराठा समाजही आता जरांगे-पाटलांना ओळखायला लागला आहे, असे डॉ. कुटे म्हणाले.

जी गोष्ट अशक्य असते, ते मागणे त्याचा हट्ट करणे हा बालहट्ट असतो आणि या बालहट्टापायीच सगळा समाज आणि सगळा महाराष्ट्र तसेच शासन वेठीस धरणे, अतिशय निंदनीय आहे. त्यांनी अजूनही विचार करावा, या पद्धतीची एकेरी भाषा, ही तर बिलकूल शोभत नाही.

महाराष्ट्रामध्ये कोणाला शिव्या दे, कुणाचीही निंदा कर, हे योग्य नाही. मला वाटते की, आतापर्यंतची सहानुभूती आमच्या मराठा समाजाची होती, ती आता हळूहळू कमी होत चालली आहे. हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांची चिडचिड होत आहे, असा आरोपही आमदार कुटे यांनी केला आहे.

Edited By : Atul Mehere

R

Dr. Sanjay Kute, Manoj Jarange and Devendra Fadanvis
MLA Sanjay Gaikwad : वाघाची शिकार केली, दात गळ्यात घातला; शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड अडचणीत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com