Chitra Wagh, Uddhav Thackeray News Sarkarnama
मुंबई

Chitra Wagh On Thackeray: 'राष्ट्रपतिपदी आदिवासी महिला आहेत हे उद्धव ठाकरेंना बघवत नाही'; चित्रा वाघांचा ठाकरेंना टोला

Shiv Sena News : उद्धव ठाकरे यांनी शनिवारी ठाण्यामध्ये उत्तर भारतीय नागरिकांचा मेळावा घेतला होता.

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray News: मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचारावरुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली होती. मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत. देशाच्या राष्ट्रपती आदिवासी महिला आहेत, त्यांनी या घटानांकडे लक्ष दिले पाहिजे, असे ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन भाजपच्या (BJP) महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ठाकरेंना लक्ष्य केले.

चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्वीट करत उद्धव यांच्यावर निशाणा साधला. ''राष्ट्रपतीपदी आदिवासी महिला आहेत हे उद्धव ठाकरेंना बघवत नाही. उद्धवजी तुमची स्वतःची प्रतिष्ठा उरली नाही. म्हणून सर्वोच्च पदाची प्रतिष्ठा कमी करण्याचे प्रयत्न करताय, हे किती लाजिरवाणं…! अडीच वर्ष घरकोंबडा बनून राहणारे तुम्हीं… टीका तर सोडा तुमची तर लायकीही नाही राष्ट्रपती पदाबाबत बोलण्याची… तुमची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हे सगळे चालले, यावरून तुम्ही किती खालचा दर्जा गाठला हे ही कळतेय जनतेला…'' अशा शब्दांत वाघ यांनी ठाकरेंचा समाचार घेतला.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शनिवारी ठाण्यामध्ये उत्तर भारतीय नागरिकांचा मेळावा घेतला होता. या मेळाव्यामध्ये बोलताना ते म्हणाले होते, मी राष्ट्रपतींना विचारतो, त्या काय करत आहेत. देशात महिलांवर अत्याचार होत आहेत, असा सवाल उपस्थित केला होता. मणिपूरच्या घटनेकडे राष्ट्रपतींनी लक्ष दिले पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले होते.

दरम्यान, मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करत त्यांची धिंड काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओत जमाव महिलांना विवस्त्र करून रस्त्याने घेऊन जाताना दिसला. यात जमावातील काही लोक पीडितेच्या शरीराला ओरबाडत विटंबना करत असल्याचेही दिसले होते. या व्हिडिओवर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया आल्या होत्या.

याच प्रकरणावरुन विरोधकांनी संसदेमध्ये चर्चेची मागणी केली आहे. मणिपूरवरून संसदेत मोठा गदारोळही झाला होता. विरोधी पक्षांचे २० खासदार सध्या मणिपूरच्या दौऱ्यावर आहेत. तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन ते केंद्र सरकारला आणि संसदेला अहवाल देणार आहेत. याच घटनेवरुन ठाकरे यांनी भाजपवर टिकास्त्र सोडले होते.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT