BJP Shock To Jankar : भाजपने दुसऱ्यांदा फोडला मित्रपक्ष रासपचा आमदार; महादेव जानकरांच्या भूमिकेकडे लक्ष

भाजपने आपले मित्र असलेल्या जानकरांच्या पक्षाचा दुसरा आमदार आपल्या कळपात ओढून घेतला आहे.
Rahul Kul-Mahadev Jankar-Ratnakar Gutte
Rahul Kul-Mahadev Jankar-Ratnakar GutteSarkarnama
Published on
Updated on

Pune : परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांना गळाला लावून भाजपने आपल्या मित्रपक्षाचा दुसरा आमदार फोडला आहे. यापूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले दौंडचे आमदार ॲड राहुल कुल यांनीही २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश करत पुन्हा आमदार झाले आहेत. त्यामुळे भाजपने आपले मित्र असलेल्या जानकरांच्या पक्षाचा दुसरा आमदारही आपल्या कळपात ओढून घेतला आहे. (Mahadev Jankar's party MLA was run away by BJP for second time)

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच परभणी जिल्ह्याचा दौरा केला. त्या दौऱ्यात त्यांनी थेट राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार गुट्टे यांनाच गळाला लावण्याचे काम केल्याचे दिसून येत आहे. माझी आमदार रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांच्याशी चर्चा झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत गुट्टे हेच गंगाखेडचे भाजपचे उमेदवार असतील, असे बावनकुळे यांनी जाहीरच करून टाकले आहे.

Rahul Kul-Mahadev Jankar-Ratnakar Gutte
Pimpri Chinchwad Corruption : पिंपरी पालिकेतील गैरव्यवहारात मुख्यमंत्र्यांनी घातले लक्ष; आयुक्तांना मागितला अहवाल

काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या ‘एनडीए’च्या बैठकीचे आमंत्रण नसल्यामुळे महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी संताप व्यक्त केला होता. तसेच, आपण कोणापुढे भीक मागणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. जानकर हे अगोदरच भाजपवर संतापलेले आहेत. त्यात पुन्हा त्यांच्या पक्षाकडून निवडून आलेल्या आमदारालाच फोडण्याचे काम भाजपकडून होत आहे, त्यामुळे जानकर यांची भूमिका काय असणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

Rahul Kul-Mahadev Jankar-Ratnakar Gutte
BJP News : महाराष्ट्राच्या प्रभारीपदावरून हटवलेल्या भाजप नेत्याला लागणार प्रदेशाध्यक्षपदाची लॉटरी!

भाजपने (bjp) जानकर यांच्या पक्षाचा आमदार दुसऱ्यांदा फोडला आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड विधानसभा मतदारसंघातून २०१४ च्या निवडणुकीत ॲड राहुल कुल (Rahul kul) हे राष्ट्रीय समाज पक्षाच्या (RSP) चिन्हावर निवडून आले होते. मात्र, लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीच्या तोंडावर कुल यांनाही भाजपने गळाला लावत त्यांच्या पत्नीला बारामती लोकसभा मतदारसंघातून भाजपचे तिकिट दिले हेाते. त्यानंतर झालेली विधानसभा निवडणूक कुल यांनी भाजपच्या तिकिटावर लढवून जिंकली होती. त्यामुळे भाजपने आपल्याच मित्रपक्ष असलेल्या रासपचे दोन आमदार फोडल्याचे दिसून येत आहे.

Rahul Kul-Mahadev Jankar-Ratnakar Gutte
Congress MLA Will Split? : काँग्रेस आमदार अस्वस्थ, महाआघाडीतून फुटून भाजपत प्रवेश करणार; भाजप खासदाराचा गौप्यस्फोट

दरम्यान, नव्या मित्रपक्षामुळे भाजपकडून जुन्या मित्रांकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप त्यांच्या मित्रांकडून होत आहे. एनडीएच्या बैठकीचे निमंत्रण जानकर यांच्याबरोबर सदाभाऊ खोत आणि मेटे यांच्या संघटनेला नव्हते. त्यावेळी जानकर यांनी आपला त्रागा व्यक्त केला होता. आता सलग दुसऱ्या पंचवार्षिकला आपला आमदार फोडल्यानंतर जानकर यांची प्रतिक्रिया काय असणार, याकडे लक्ष असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com