Chitra Wagh Criticizes Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

गधे को दिया मान…गधा पहुँचा आसमान! चित्रा वाघ यांच्या मनातलं गाढव कोण?

मागील काही दिवसांपासून संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यामध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सोमवारी सकाळी ‘गधे को दिया मान, गधा पहुँचा आसमान,’ असं ट्विट केलं आहे. वाघ यांनी त्याखाली #शिवीगाळ हा हॅशटॅगही वापरला आहे. त्यामुळे त्यांच्या मनातलं गाढव कोण, अशी चर्चा आता सोशल मीडियात रंगली आहे.

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे मागील काही दिवसांपासून भाजपचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर सतत निशाणा साधत आहेत. त्यांच्याकडून काही आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला जात असल्याची टीका भाजपकडून केली जात आहे. 'देशाच्या राजकारणात मोठे बदल घडत असून 2024 नंतर स्वच्छ आणि पारदर्शी सरकार येणार. त्यानंतर देशाच्या राजकारणातून सोमय्यासारखे XXX लोक नाहीसे होतील," अशी टिपण्णी राऊत यांनी सोमय्या यांच्यावर केली होती. (Chitra Wagh Criticizes Sanjay Raut)

सोमय्यांनीही त्याला प्रत्युत्तर दिले होते. मी संजय राऊतांना सांगणार आहे की, एकदाच मला शिव्यांची डिक्शनरी देऊन टाका, उगाच माझ्या आईला सारखा सारखा संताप नको, अशा खोचक शब्दांत राऊतांवर पलटवार केला आहे. राऊत आणि सोमय्या यांच्या या शाब्दिक चकमकीमध्ये आता चित्रा वाघ यांनीही उडी घेतली आहे. (Sanjay Raut Kirit Somaiya latest news)

वाघ यांनी सोमवारी सकाळी ट्विट करत राऊतांवर निशाणा साधल्याची चर्चा आहे. 'शिव्या द्यायला शिवशिवणार्या शिवराळ मनस्थितीचं नाव “सर्वज्ञानी” गधे को दिया मान…गधा पहुँचा आसमान,’ असं वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्याखाली त्यांनी #शिवीगाळ हा हॅशटॅग वापरला आहे. त्यामुळे वाघ यांनी राऊतांना जोरदार टोला लगावल्याची चर्चा आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी आपल्या शब्दांचे समर्थन केले. ते म्हणाले, कुणीजर महाराष्ट्रद्रोही असतील तर त्यांनी आरती करायची का? ज्यांना जी भाषा समजते, त्याच भाषेत बोललं पाहिजे. अशा लोकांना हजार मारल्या तर एकच मोजावी, असंही संत सांगून गेले आहेत, असंही राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT