Shambhuraj Desai, Chitra Wagh Sarkarnama
मुंबई

नामर्द आणि माजोरड्या वृत्तीला वेळीच चिरडलं पाहिजे! चित्रा वाघ संतापल्या

वनरक्षक महिला कर्मचाऱ्याला माजी सरपंचाने केलेल्या मारहाणीचा सर्वत्र निषेध होत आहे.

सरकारनामा ब्युरो

सातारा : जिल्ह्यातील पळसवेड गावच्या माजी सरपंचाने वनरक्षक महिला कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याच्या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात आहे. भाजपच्या (BJP) उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनीही तीव्र शब्दांमध्ये या घटनेचा निषेध करत कडक कारवाईची मागणी केली आहे. तसेच या घटनेवरून त्यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यावर निशाणा साधला आहे.

महिला वनरक्षक सिंधू सानप (Sindhu Sanap) यांना मारहाण करणारा माजी सरपंच रामचंद्र जानकर (Ramchandra Jankar) व त्याच्या पत्नीला सातारा (Satara) पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेबाबत वाघ यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. 'साता-यात पळसवडेचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यानं गर्भवती वनरक्षक महिलेला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे. अशा नामर्द आणि माजोरड्या वृत्तीला वेळीच चिरडलं पाहिजे,' असा संताप वाघ यांनी व्यक्त केला आहे.

ही घटना सातारा जिल्ह्यातील असल्याने वाघ यांनी शंभूराज देसाई यांच्यावर निशाणा साधला आहे. 'शंभुराज देसाई, तुम्ही गृहराज्यमंत्री.. तुम्हालाच स्वतःचा जिल्हा सांभाळता येत नसेल तर राज्य कसं सांभाळणार, असा सवाल त्यांनी केला आहे. दरम्यान, या घटनेची राज्य महिला आयोगानेही गंभीर दखल घेतली आहे. याबाबत सातारा पोलीस अधिक्षकांकडे अहवाल मागवला असून कटक कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

दरम्यान, जानकर हे स्थानिक वनसमितीचे सदस्य आहेत. त्यांना न विचारता वन मजूरांना इतर नेल्याचा राग आल्याने सानप यांना मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. सानप यांच्या तक्रारीनंतर जानकर व त्यांच्या पत्नी प्रतिभा जानकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी बुधवारी दोघांनाही अटक केली आहे.

याबाबत बोलताना सानप म्हणाल्या, कामावर रुजू झाल्यापासून ते मला धमकी देत आहे. पैशांची मागणी करत होते. पण त्यांना नकार देत होते. बुधवारी कामावरून घरी परतत असताना त्यांनी मला मारहाण केली. माझ्या पतीला स्लीपरने मारले, असा आरोप सानप यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT