Kirit Somaiya on Mahavikas Aaghadi Sarkarnama  Sarkarnama
मुंबई

Kirit Somaiya On MVA : सोमय्यांच्या हाती हातोडा; काय आहे प्रकरण? आदित्य ठाकरे,अस्लम शेख यांच्यावर 'हे' गंभीर आरोप

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : मुंबई महापालिकेकडून मढ-मालाड येथील अनधिकृत स्टुडिओ पाडण्याचं काम शुक्रवारी(दि.७)सकाळपासून सुरु आहे. या यासंबंधी नेशनल ग्रीन ट्रिब्यूनल आदेश दिल्यानंतर ही कारवाई करण्यात येत आहे. मात्र, या कारवाईवरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह अस्लम शेख यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

मुंबई मढ येथील अनधिकृत स्टुडिओ पाडण्यासाठी मुंबई महापालिकेकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे.भाजप नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya) हे हातात हातोडा, फावडं घेऊन संबंधित स्टुडिओची पाहणी करण्यासाठी निघाले आहेत.आता यावेळी सोमय्या यांनी ठाकरे सरकारमध्ये माफियांचं राज्य होतं. अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे यांच्या कृपेने 2021 मध्ये डझनभर अनधिकृत स्टुडिओ मलाडमध्ये उभारण्यात आल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहेत.यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि शिंदे फडणवीस सरकार वाद पेटण्याची शक्यता आहे.

सोमय्या काय म्हणाले?

कोविडच्या काळात स्थानिक आमदार अस्लम शेख आणि मुंबईचे तत्कालीन पालक मंत्री आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) यांच्या कृपेने मढ येथे समुद्र किनारी अनधिकृत स्टुडिओ उभारण्यात आला आहे असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. २०२१ मध्ये ५० हजार स्क्वेअर फूटचे स्टुडिओ आदित्य ठाकरेंच्या मंत्रालयाने परवानगी दिली होती असंही सोमय्या म्हणाले आहेत.

तसेच उद्धव ठाकरे याच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिके(BMC)ने आओ जावो राज तुम्हारा असा कारभार केला. मातोश्रीला हिशोब द्या आणि जे करायचे ते करा असंच चाललं होतं. पण आता मोदी हे तो मुमकीन है, आजपासून हे अनधिकृत स्टुडिओ पाडण्यात येणार असल्याची माहितीही सोमय्या यांनी यावेळी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT