Karnataka Assembly Election : भाजप उमेदवारीचे पत्ते खुले करणार ; प्रत्येक विधानसभेसाठी तीन नावांची शॉर्टलिस्ट..

Karnataka Assembly Election BJP finalise candidates : ९ एप्रिल रोजी यादी जाहीर करण्याची शक्यता आहे.
BJP
BJP Sarkarnama
Published on
Updated on

Karnataka Assembly Election BJP finalise candidates : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Election) काँग्रेस, जेडीएस आणि आम आदमी पक्षाने आपल्या उमेदवारीची यादी जाहीर केल्यानंतर आता भाजप उमेदवारांची यादी कधी जाहीर करणार याची सगळ्यानाच उत्सुकता आहे.

राज्यातील सत्ताधारी भाजपने अद्याप आपले पत्ते उडलेले नाहीत. उमेदवारी यादी पक्षश्रेष्ठींकडे पाठवली असून त्यावर विचारविनिमय सुरु आहे. भाजप दोन दिवसात म्हणजे ९ एप्रिल रोजी यादी जाहीर करण्याची शक्यता आहे.

इच्छुक उमेदवारांच्या नावावर नऊ एप्रिल रोजी अंतिम चर्चा होणार आहे. यासाठी केंद्रीय निवडणूक समितीची बैठक दिल्लीत भाजपच्या मुख्य कार्यालयात होणार आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, महासचिव बीएल संतोष, केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.

कर्नाटक (Karnataka) विधानसभेसाठी भाजपच्या कोअर ग्रुपने प्रत्येक विधानसभेसाठी तीन नावांची निवड केली आहे. ही तीन नावे केंद्रीय निवडणूक समितीसमोर ठेवण्यात येणार आहेत. या नावातून एक नाव निवडण्यासाठी पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार आहेत.

BJP
Bihar MLC Election Result : मोठी बातमी ; निवडणूक रणनीतीकार PK यांची राजकारणात एन्ट्री ; विधान परिषदेत खातं उघडलं..

चार एप्रिल रोजी कर्नाटक भाजप कोअर ग्रुपने पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह, राज्य निवडणूक प्रभारी धमेंद्र प्रधान, सहप्रभारी मनसुख मंडाविया, समितीचे सदस्य अन्नामलाई, माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांच्या बैठकीत उमेदवारांच्या नावाची छानणी करण्यात आली, ही नावे केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठविण्यात आली आहेत.

काँग्रेस पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी नुकतीच जाहीर केली आहे. या यादीत 42 उमेदवारांना पक्षाचे तिकीट देण्यात आले आहे. विशेष म्हणजे भाजप आणि जेडीएसमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या ३ उमेदवारांनाही तिकीट दिले आहे.

BJP
Nitin Gadkari Threat Case: गडकरी धमकी प्रकरणात मोठी अपडेट; चौकशीत धक्कादायक खुलासे, केंद्रीय तपास यंत्रणेकडे..

काँग्रेसच्या या यादीत भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी आमदार गोपालकृष्ण, मोलकलमुरू यांना तिकीट देण्यात आले आहे. यापूर्वी 25 मार्च रोजी कर्नाटक काँग्रेसने 124 उमेदवारांची यादी जाहीर केली होती.

Karnataka Assembly Election
Karnataka Assembly ElectionSarkarnama

भाजपमधून बाहेर पडलेले माजी आमदार बाबुराव चिंचनसूर, गुरुमितकल आणि भाजपमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या आणखी एका आमदाराला तिकीट देण्यात आले आहे. यासोबतच जेडीएस सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी आमदार श्रीनिवास यांना गुब्बीमधून रिंगणात उतरवण्यात आले आहे.

दहा मे रोजी कर्नाटकमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. एकूण २२४ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा निकाल १३ मे रोजी जाहीर होणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला १०४ जागा मिळाल्या होत्या. भाजपने सत्ता स्थापन केली होती, तर काँग्रेस ८०, जेडीएसने ३७ जागा जिंकल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com