Sanjay Raut, Medha Somaiya, Kirit Somaiya Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : सोमय्या मानहानी प्रकरणी राऊतांची सत्र न्यायालयात धाव, दिलासा मिळणार?

Sanjay Raut Takes Legal Step in Medha Somaiya Defamation Case: भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटला प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 24 Oct : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणी आता राऊतांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.

दंडाधिकारी न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात राऊत यांनी दाखल केलेल्या अपीलवर गुरूवारी सत्र न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे आता या सुनावणीत राऊतांना दिलासा मिळणार की त्यांच्या अडचणीत वाढ होणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

भाजपचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत 15 दिवसांची कोठडी व 25 हजारांचा दंड देखील ठोठावला होता.

ही शिक्षा सुनावल्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तातडीने जामिनासाठी केला होता. त्यानुसार न्यायालयाने अपिल करण्यासाठी मुभा देत त्यांना 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता.

नेमकं प्रकरण काय?

मिरा भाईंदर (Mira Bhayander) शहरात 2022 साली सार्वजनिक शौचालयं बांधण्याचे कंत्राट निघालं होतं. त्यातील 16 शौचालयांचे काम मेधा सोमय्या यांच्या युवा प्रतिष्ठानला मिळालं होतं. यात सीआरझेडचे उल्लंघन केलं आणि कामात बनावट कागदपत्रे सादर करत मिरा भाईंदर पालिकेची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता.

यावर मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात न्यायलयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. तर या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान, माझगाव कोर्टाने राऊतांना शिक्षा सुनावली होती. यानंतर राऊतांनी सत्र न्यायालयात घेतली. पुढील 30 दिवसांच्या आत वरच्या कोर्टात दाद मागण्यासाठी माझगाव कोर्टाने मुभा दिली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT