Maharashtra Vidhan Sabha Election Live Update : काँग्रेसने जाहीर केली पहिली उमेदवारी यादी; जाणून घ्या, किती जणांचे नाव केले घोषित!

Maharashtra Assembly Election 2024 Latest News : विधानसभा निवडणुकीसाठी विविध पक्षातील उमेदवार आपापले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. गुरुवारी (ता.24) भाजपचे चंद्रकांत पाटील, राधा कृष्ण विखे पाटील, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यासह अनेक दिग्गज नेते आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
Congress News
Congress NewsSarkarnama
Published on
Updated on

काँग्रेसची पहिली उमेदवारी यादी जाहीर

काँग्रेसने अखेर आज आपली पहिली 48 जणांची उमेदवारी यादी जाहीर केली आहे. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, रविंद्र धंगेकर आदी दिग्गजांची नावे आहेत.

Congress News
Congress First List : ...अखेर काँग्रेसची 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर! 'या' दिग्गज नेत्यांना तिकीट

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाची पहिली उमेदवारी यादी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाची पहिली ४५ उमेदवारांची यादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पुण्यात पत्रकारपरिषद घेऊन जाहीर केली.

Congress News
NCP SP Candidate List: मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवार यादी जाहीर, बारामतीचाही चेहरा ठरला

समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादीचा दिला राजीनामा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. कारण, समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष होते. आता अपक्ष निवडणूक लढणार आहेत.

Congress News
Sameer Bhujbal Video : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून सर्वात मोठी बातमी! अजितदादांना 'दे धक्का', तोही भुजबळांकडून..!

आदित्य ठाकरेंकडून उमेदवारी अर्ज दाखल

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.याप्रसंंगी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांची उपस्थिती होती.

Parvati Assembly Constituency Aba Bagul: आबा बागुलांनी गुरुपुष्पामृतचा मुहूर्त साधला!

काँग्रेस नेते, पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही आहे. काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अपक्ष असेच एकूण तीन अर्ज बागुल यांच्याकडून दाखल करण्यात आले आहेत. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अद्याप पर्वतीमध्ये कोणालाही उमेदवारी जाहीर केलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे असणारा मतदारसंघ काँग्रेस आपल्याकडे घेण्यासाठी आग्रही आहे. आपल्याला उमेदवारी मिळण्याचा विश्वास असून आज गुरुपुष्पामृत मुहूर्त असल्याने उमेदवारी दाखल केल्याचे आबा बागुल यांनी सांगितले.

Anil Gote Joins Uddhav Thackeray Shivsena
Anil Gote Joins Uddhav Thackeray ShivsenaSarkarnama

Anil Gote Joins Uddhav Thackeray Shivsena : भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांनी बांधले शिवबंधन

भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार अनिल गोटे यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. त्यांना धुळे शहरातून ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांना एबी फॉर्म दिला आहे. ‘मी तुम्हाला उमेदवार देतो तुम्ही मला आमदार द्या’, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी अनिल गोटे यांच्या कार्यकर्त्यांना केले आहे.

Maharashtra Vidhan Sabha
Maharashtra Vidhan Sabha Sarkarnama

एरंडोल-पारोळा मतदारसंघात दीड कोटींची रोकड जप्त

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आचारसंहिता पथकाने मोठी कारवाई केली आहे. नाकाबंदी करताना जळगाव पोलिसांची मोठी कारवाई केली आहे. जळगाव एरंडोलमध्ये दीड कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. एरंडोलजवळील कासोद गावात नाकाबंदी करीत असताना एका कारमध्ये रोकड सापडली. ही रोकड कुणाची आहे, कशासाठी आणली होती याचा तपास पोलीस करीत आहेत.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील Sarkarnama

देवदर्शन माझा राजकीय अजेंडा नाही - चंद्रकांत पाटील

भाजप उमेदवार चंद्रकांत पाटील आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्याआधी यांनी पुण्यातील विविध मंदिरांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी शंकर महाराज मठ आणि कसबा गणपतीचं दर्शन घेतलं. तर देवदर्शन हा माझा राजकीय अजेंडा नाही, देवावर माझी श्रद्धा मी देव मानणारा माणूस आहे, असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज ठाकरे ठाण्यात दाखल होणार

आजच्या गुरुपुष्यामृत मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल केल्यास लाभ होईल असा अंदाज असल्याने अनेकजण आजच उमेदवारी अर्ज दाखल करतील असं सांगितलं जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर मतदारसंघाचे उमेदवार अविनाश जाधव उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यासाठी राज ठाकरे ठाण्यात दाखल होणार आहेत. तर शिर्डीमधून राधाकृष्ण विखे पाटील अर्ज दाखल करणार आहेत.पुण्यातून चंद्रकांत पाटील अर्ज दाखल करणार आहेत. बीडमधून आज धनंजय मुंडेही अर्ज भरणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com