Kirit Sommaiya
Kirit Sommaiya Sarkarnama
मुंबई

किरीट सोमय्या म्हणाले, तेरा क्या होगा कालिया?

Sampat Devgire

मुंबई : सचिन वाझे (Sachin Waze) च्या वसुली मधून कॉन्टॅक्टर चे पैसे दिले अस जर वाझेनी सांगितलं तर ' तेरा क्या होगा कालिया', सचिन वाझे, बजरंग खरमाटे जर माफीचा साक्षिदार झाला तर ' तेरा क्या होगा कालिया', असा प्रश्न भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Sommaiya) यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याबद्दल केला आहे. (BJP leader Kirit sommaiya said i have given all papers to ED)

तो काल शहरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, बजरंग खारमाते म्हणजे अनिल परबचा सचिन वाझे आहे. सचिन वाझेनी जर सांगितलं की माझी नियुक्ती उद्धव ठाकरेंमुळे झाली तर 'तेरा क्या होगा कालिया' असा प्रश्न त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले, सचिन वाझेला सीबीआय ने माफीचा साक्षिदार होण्यास मंजुरी दिली आहे. सचिन वाझे बोलू लागले तर उद्धव ठाकरेंना भीती वाटते. ते म्हणतात, 'मेरा क्या होगा'. तेरा क्या होगा कालिया, जर वाझेनी सांगितलं की, दापोली च्या रिसॉर्टचे पैसे कोणी दिले?.

सामनाचे संपादक आणि पोलीस महासंचालक यांना विनंती आहे, की आमदारांचा घोडे बाजार महाराष्ट्रात सुरू आहे. उद्धव ठाकरेंकडून माहिती घेऊन बाजार मंडणाऱ्यांवर कारवाई करावी. मुख्यमंत्री यांची जवाबदारी आहे की, त्यांच्या वर्तमानपत्रात आलेली माहिती त्यांनी निवडणूक आयोग, पोलीस याना का दिली नाही?.

मुख्यमंत्र्यांचा जबाब घेऊन सामनच्या संपादकांचा देखील जबाब घ्यावा आणि कारवाई करावी. आमदारांना घोडे म्हणण्याचं काम गाढवच करू शकतात. बेईमान कोण? असा प्रश्न करून त्यांनी शिवसेनेचे आमदार, त्यांना समर्थन देणारे आमदार की नेते बेईमान आहेत, असे विचारले.

भाजपची मागणी आहे की, अशा भ्रष्टाचारावर चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे. हे जर खोट असेल तर खोटं बोलणाऱ्यांवर पण कारवाई झाली पाहिजे. शिवाजी पार्क समोर उभी असलेली रिकामी इमारत आहे. ती श्रीजी होम इमारत कोणाची आहे. खासदार संजय राऊत यांनी एकूण घ्यावे की, सोमैय्याने ईडी कडे सगळी कागदपत्र दिली आहेत. श्रीजी होम्स कंपनी अजूनही रजिस्टर झालेली नाही.

किरीट सोमैय्या म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचे मेहुने श्रीधर पाटणकर आणि राहुल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी मिळून श्री जी होम्स ही बनवली आहे. त्याची चौकशी झाल्यावर सगळे उगड होईल.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT