नाशिक : जगातील सगळ्यात मोठ्या अर्थव्यवस्थेत भारताचा (India) पाचवा, क्रयशक्तीच्या आधारे तिसरा क्रमांक लागत असला, तरीही दरडोई उत्पन्नात देशाचा १४२ वा क्रमांक लागत असून, बांगलादेश आपल्यापुढे आहे, अशी माहिती काँग्रेस नेते (Congress) माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी दिली. (India at 142nd rank in Per capita inc
श्री. चव्हाण नाशिक येथे आले होते. यावेळी त्यांनी ही माहिती . देशापुढील विविध गंभीर प्रश्नांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. यावर सध्याचे सरकार भूमिका घेणे टाळत असल्याचे ते म्हणाले. लोकसंख्या विस्फोटात आपण चीनला मागे टाकणार आहोत. त्यामुळे शेतीत प्रगती करावी लागेल. सध्या अर्थव्यवस्थेच्या ८६ टक्के कर्ज केंद्र सरकारने घेतले आहे. जपानचे २१५ आणि अमेरिकेचे १५० टक्के कर्ज असले, तरीही आणखी आपण कर्ज घेत राहिल्यास सापळ्यात देश अडकेल.
सध्या केंद्र सरकार केवळ कर वाढविण्याचा पर्याय अवलंबते आहे. गेल्या आठ वर्षांत केंद्र सरकारने २७ लाख कोटी इंधनाच्या करापोटी जमा केले आहेत. एव्हढा पैसा जमा करूनही सरकार महागाई वाढवतच आहे. श्रीलंकेतील असंतोष आणि पाकिस्तानमधील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेचे प्रश्न तयार झाल्यावर केंद्राने दुरुस्तीला सुरवात केली आहे.
ते पुढे म्हणाले, कर्ज घेणे, करवाढीनंतर सरकारी कंपन्या विकण्याचा सपाटा केंद्र सरकारने लावला आहे. देशात सार्वजनिक क्षेत्रातील २५० उपक्रम आहेत. २०१४ ते २०२१ पर्यंत देशात १० हजार ७५६ परकीय उद्योग होते. २०१४ नंतर २ हजार ७०० कंपन्या देशातील कारभार गुंडाळून गेल्या आहेत. निवडून आलेल्यांची अधिकारशाही असे मूल्यांकन आपल्या देशाच्या लोकशाहीचे आता होऊ लागले आहे. धार्मिक ध्रुवीकरणामुळे असहिष्णुतेच्या दिशेने देशाची सुरू झालेली वाटचाल परदेशी कंपन्यांनी देशातील गाशा गुंडाळण्यामागील कारणांपैकी एक आहे.
‘मेक इन इंडिया’ अपयशी ठरले. अर्थव्यवस्थेतील उत्पादन क्षेत्राचा वाटा १६ टक्क्यांवरून २५ टक्के, विकास दर १२ टक्के, १० कोटी नवीन रोजगारनिर्मिती करणे ही उद्दिष्ट्ये होती, पण उत्पादन क्षेत्राचा वाटा १३ टक्क्यांपर्यंत घसरला आणि उद्योग-धंद्याकडून अडीच लाख लोक शेतीकडे वळाले. नवीन तंत्रज्ञानामुळे रोजगारावर परिणाम झाला असताना, नवीन नोकऱ्या गुणवत्ताधारक-कौशल्याधिष्ठित मनुष्यबळाला मिळतील.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.