Ganesh Naik High Court Notice Sarkarnama
मुंबई

Ganesh Naik: भाजपच्या मंत्र्याला हायकोर्टाचा दणका; ठाकरे गटानं आणलं अडचणीत; काय आहे प्रकरण

Ganesh Naik High Court Notice: अनेक मतदारांना वगळण्यात आले असून सत्तेच्या बळावर व भ्रष्टाचाराचा अवलंब करत ही निवडणूक गणेश नाईक यांनी जिंकल्याचा आरोप मनोहर मढवी यांनी केला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: पालघरच्या पालकमंत्र्यांची धुरा सांभाळणारे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.ऐरोली विधानसभामतदारसंघातून ते निवडून आले आहेत.

त्यांच्या विजयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांची सुनावणी झाली. उद्धव ठाकरे गटाची याचिकेवर निकाल देताना न्यायालयाने गणेश नाईक यांना नोटीस बजावली आहे.

गणेश नाईक यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकल्याचा आरोप ठाकरे गटानं केला आहे. याबाबत ठाकरे गटाने नाईक यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर सोमवारी सुनावणी झाली. पुढील सुनावणीच्या वेळी नाईक यांनी याचिकेवर उत्तर सादर करावे, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

ठाकरे गटाचे उमेदवार मनोहर मढवी यांनी अ‍ॅड. असीम सरोदे, अ‍ॅड. श्रीया आवले यांच्यामार्फत कोर्टात याचिका दाखल केली आहे. ऐरोली विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात मतदार याद्यांमध्ये घोटाळा झाला आहे.

अनेक मतदारांना वगळण्यात आले असून सत्तेच्या बळावर व भ्रष्टाचाराचा अवलंब करत ही निवडणूक गणेश नाईक यांनी जिंकल्याचा आरोप मनोहर मढवी यांनी केला आहे.

न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या एकलपीठासमोर सोमवारी प्राथमिक सुनावणी झाली. 'ऐरोली विधानसभेची निवडणूक प्रक्रिया संशयास्पद आहे. गणेश नाईक यांना अपात्र ठरवण्यात यावे, असा युक्तिवाद अ‍ॅड. असीम सरोदे यांनी न्यायालयात केला. सरोदे यांच्या युक्तीवादाची दखल घेत न्यायालयाने नाईक यांना नोटीस बजावली आहे.

पालघर ठाण्याशी जवळचा संबंध असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची नुकतीच पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी वर्णी लागली आहे. त्यांनी पालघर जिल्ह्यातील स्वामित्व योजनेच्या कार्यक्रमात पालघरचे पालकमंत्री होण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानंतर राज्य सरकारने शासन निर्णय काढून राज्यातील पालकमंत्र्यांची घोषणा केली. त्यामध्ये नाईक यांना पालघरच्या पालकमंत्र्यांची धुरा देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT