Sanjay Raut, Mohit Kamboj sarkarnama
मुंबई

'सामना' कार्यालयात धमकावून राऊतांनी माझ्याकडून २५ लाख रुपये घेतले...

Mohit Kamboj|Sanjay Raut|BJP|Shivsena : भाजप नेते मोहित कंबोज यांनी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप केला आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मला दैनिक 'सामना'च्या कार्यालयात मला बोलावून धमकावले आणि माझ्याकडून २५ लाख रुपयेही घेतले होते, असा खळबळजनक दावा भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी केला आहे. राऊत हे मला हे पैसे व्याजासकट परत देणार होते. मात्र, आजपर्यंत त्यांनी हे पैसे मला परत केले नाही. राऊतांना मी धनादेशाद्वारे २५ लाख रूपये दिलेले आहेत. तसेच या धनादेशाचे तपशील आणि इतर पुरावे देखील मी द्यायला तयार आहे. मात्र, याआधारे मुंबई पोलीस राऊतांवर गुन्हा दाखल करायला तयार आहेत का? असा सवाल कंबोज यांनी मुंबई पोलिस आयुक्तांनी विचारला आहे.

कंबोज यांनी आज (ता. 7 एप्रिल) आपला एक व्हीडिओ ट्विट करून याबाबत आपले मत मांडले आहे. कंबोज म्हणाले की, २०१४ साली संजय राऊत यांनी मला 'सामना'च्या कार्यालयात बोलावून धमकावले आणि माझ्याकडून २५ लाख रुपये घेतले. हे पैसे ते मला व्याजासकट परत करणार होते. मात्र, आजपर्यंत त्यांनी हे पैसे परत केले नाहीत. याबाबातचे सीसीटीव्ही फुटेजही चेक करू शकता. तुम्हाला त्यामाध्यमातून सगळी माहिती मिळेल. तसेच राऊतांनी मला 'सामना' कार्यालयात बोलावलं तेव्हा त्या ठिकाणी अजून तीनजण होते. आणि हे तिन्ही बड्या व्यक्ती असून या तिघांनाही आपण याप्रकरणी साक्षीदार व्हायला तयार आहेत.

राऊतांनी मला ५० लाख रुपये मागितले होते. मात्र, मी त्यांना २५ लाख रुपयेच दिले होते. हे पैसे ते व्याजासकट मला परत करणार होते. मात्र, त्यांनी पैसे परत दिले नाही. त्यामुळे मुंबई पोलिसांनी राऊतांवर गुन्हा दाखल करावा. तसेच आयएनएस विक्रांत प्रकरणी पोलिसांनी ऐकीव माहितीच्या आधारे किरीट सोमय्यांवर गुन्हा दाखल केल आहे. मग आता माझी तक्रार पोलीस दाखल करुन घेणार का नाही? याचे उत्तर पोलिस आयुक्त संजय पांडेंनी द्यावे, असे कंबोज यांनी म्हटले आहे. आता कंबोज यांनी केलेल्या या आरोपांवर राऊतांची काय प्रतिक्रिया येते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT