डीएनए चेक करो, सलीम शेख तुम मुसलमान नही हो सकते!

`मनसे`चे नगरसेवक सलीम शेख यांच्या आवाहनाने ते चर्चेत आले आहेत.
Salim Shaikh & Raj Thakre
Salim Shaikh & Raj ThakreSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : मशीदीवरील (Mosque) भोंगे हटवावेत हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे बाबरी मशीदीचा निर्णय समाजाने मान्य केला. तसेच आपण सर्व राज्यघटना (Constitution) व कायदा पाळणारे लोक असल्याने मुस्लीम समाजाने स्वतःहून भोंगे हटविल्यास देशात व जगभर एक वेगळा संदेश जाईल, असे आवाहन मनसेचे (MNS) नगरसेवक सलीम शेख (Salim Shaikh) यांनी केले आहे.

Salim Shaikh & Raj Thakre
भारती पवारांचा गोदावरी एक्सप्रेसला ग्रीन सिग्नल!

सलीम शेख यांच्या या आवाहनावर विविध प्रतिक्रीया उमटल्या आहेत. जामनेर येथील माजी उपनगराध्यक्ष मुल्ला यांनी श्री शेख यांना फोन केला. श्री. मुल्ला यांनी, `आपण राज ठाकरे यांच्या भूमिकेला पाठींबा देता. मग हनुमान चालीसा देखील म्हणणार का?. आपण क्षुल्लक नगरसेवक पदासाठी धर्माच्या विरोधात भूमिका घेत आहात. तुम्ही तुमचा `डीएनए` तपासून पहा. तुम्ही नक्कीच मुसलमान नसाल` दुरध्वनीवरील हा संवाद सोशल मिडीयावर व्हायरल झाला. दुरचित्रवाहिन्यांवर देखील त्याच्या बातम्या झळकल्याने तो चर्चेचा विषय ठरला.

Salim Shaikh & Raj Thakre
शिवसेनेच्या मंत्र्याने प्रचार केला, तरीही `राष्ट्रवादी`चे श्रीराम शेटे जिंकलेच!

यासंदर्भात श्री. शेख म्हणाले, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत मशीदींवरील भोग्यांबाबत बोलले होते. खरे तर राज ठाकरे यांचा प्रार्थनेला, नमाज पठनाला अजिबात विरोध नाही. सर्वोच्च न्यायालयाचा मशीदीवरील भोंग्याबाबत मशीद, मंदीर या सगळ्यांविषयी निर्णय आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आहे. हा निर्णय, मग तो कोणत्याही जाती धर्माचा विषय असो त्यांनी पाळला जावा अशी अपेक्षा असते.

ते म्हणाले, या देशातील नागरिक राज्यघटनेचे पालन करणारे नागरिक आहेत. जर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला असेल की, धार्मिक स्थळांवरील भोंगे काढावेत. हे काम सरकारचे होते. माझ्या मते सोयीनुसार सरकार त्याकडे कानाडोळा करते आहे. जर आपण इतिहास तपासला तर मशीदीतील नमाज आणि भोंग्यांचा विषय हा दुरुदुरुन देखील नाही आहे. भोंग्यावर अजान दिली जाते. अजान यासाठी दिली जाते की, नमाजाची वेळ झाली आहे. बांधवांनी मशीदीत यावे यासाठी अजान दिली जाते. त्यानंतर समाजाचे बांधव नमाज पढण्यासाय़ी येत असतात. नमाज ही मशीदीतच अदा केली जाते. त्याचा आवाज बाहेर रस्त्यावर येत नसतो. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. तो सर्व जाती धर्माच्या लोकांनी पाळला पाहिजे.

ते पुढे म्हणाले, आपण जर पाहिले तर बाबरी मशीदीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानुसार तीथे राम मंदिराचे काम सुरु झालेआहे. त्यावेळेस देखील मुस्लीम समाजाने तो निर्णय मान्य केलेला आहे. हा देखील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. मुस्लीम बांधवाना माझी विनंती आहे. आपण या देशाचे संविधान माननारे व कायदा पाळणारे लोक आहोत. त्यावर आपला विश्वास आहे. त्यामुळे मुस्लीम समाजानेच स्वतः पुढाकार घेऊन हे भोंगे काढले तर देशात व जगात एक वेगळा संदेश गेल्या शिवाय राहणार नाही.

या देशात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. ईस्लाम धर्म शांततेचे प्रतिक आहे. या समाजाने कधीही हिंसा करण्याची शिकवण दिलेली आहे. प्रेषित महंमद पैगंबराच्या मार्गाने पुढे जाताना त्याचे पालन सर्वांनी केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या भूमिकेमुळे मशीदीवरील भोंगे चर्चेचा विषय ठरला आहे.

....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com